निवडणुकीच्या प्रचारात पेट्रोल, डिझेलच्या किमती का होतात स्थिर?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2020 01:11 AM2020-11-04T01:11:56+5:302020-11-04T01:12:34+5:30
petrol and diesel prices : तेलाच्या किरकोळ भावांमध्ये शेवटचा बदल हा २२ सप्टेंबर रोजी झाला होता. तेव्हापासून दिल्लीत पेट्रोलचा भाव ८१.०६ व डिझेल ७०.४६ रुपये स्थिर आहे.
- नितीन अग्रवाल
नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीत पेट्रोल, डिझेलच्या किरकोळ विक्रीच्या किमती एकदम स्थिर झाल्या आहेत. तेलाच्या किरकोळ भावांमध्ये शेवटचा बदल हा २२ सप्टेंबर रोजी झाला होता. तेव्हापासून दिल्लीत पेट्रोलचा भाव ८१.०६ व डिझेल ७०.४६ रुपये स्थिर आहे. याचा संबंध निवडणूक समीकरणांशी लावला जात आहे.
यादरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव सतत बदलत गेले. कच्चे तेल ३९.२२ डॉलर प्रति बॅरलवरून घटून ३७.८५ डॉलरवर आले. तेल कंपन्या तोट्याचे कारण सांगून सतत किरकोळ बाजारात किमती बदलत होत्या. गेल्या जवळपास दीड महिन्यापासून पेट्रोल, डिझेलचे भाव स्थिर असल्याचे कारण निवडणूक मानले जात आहे. १५ ऑगस्ट ते २२ सप्टेंबरदरम्यान तेलाचे भाव २० वेळा बदलले होते. निवडणुकीत तेलाच्या भावात बदल न होण्याची ही पहिली वेळ नाही.