महिला व पुरुषांचे बुथ एकत्र का? गावाचा मतदानावरच बहिष्कार; महिलांचेही समर्थन
By कमलेश वानखेडे | Published: November 26, 2022 12:54 PM2022-11-26T12:54:49+5:302022-11-26T12:57:51+5:30
ध्राफा हे सुमारेे ५०० घरांचे गाव. पूर्णपणे किल्ल्याच्या आत वसलेलं. संपूर्ण गावाला किल्ल्याच्या मोठमोठ्या भिंतींची तटबंंदी. येथील राजपूत स्त्रिया घरातही घुंगट ओढतात.
कमलेश वानखेडे -
ध्राफा (जामजोधपूर) : जामनगर जिल्ह्याच्या सीमेवर जामजोधपूर विधानसभा क्षेत्रांतर्गत येणारे ध्राफा हे सुमारे १,३०० लोकवस्तीचे गाव. राजपूतबहूल असलेल्या या अख्ख्या गावानेेच मतदानावर बहिष्कार टाकला आहे. स्वातंत्र्यानंंतर झालेल्या पहिल्या निवडणुकीपासून या गावातील महिला व पुरुषांसाठी वेगवेेगळी मतदान केंद्र असायची. मतदार यादीही स्वतंत्र असायची. मात्र, या निवडणुकीत मतदान केंद्र एकत्र केल्यामुळेे आपल्या परंपरेला तडा जात असल्याचे कारण देेत गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केेली आहे.
ध्राफा हे सुमारेे ५०० घरांचे गाव. पूर्णपणे किल्ल्याच्या आत वसलेलं. संपूर्ण गावाला किल्ल्याच्या मोठमोठ्या भिंतींची तटबंंदी. येथील राजपूत स्त्रिया घरातही घुंगट ओढतात. सार्वजनिक ठिकाणी पुरुषांसमोर येत नाहीत, अशी येथील रित. त्यामुळे स्वातंत्र्यानंंतरही या गावातील स्त्रिया मतदानच करीत नव्हत्या. त्यामुळेे सुमारे ५० वर्षांपूर्वी येथील स्त्री व पुरुषांसाठी किल्ल्याच्या आतच वेगवेगळेी मतदान केंद्र ठेवली जाऊ लागली. कुठलीही निवडणूक असो, मतदान केंद्र वेगवेगळीच असणार. एवढेच नव्हे तर महिलांच्या मतदान केंद्रांवर निवडणूक अधिकारी, पोलिंग एजंटही महिलाच दिल्या जायच्या. निवडणूक यंत्रणेने आमच्या परंपरेेला तडा दिल्याचे कारण देेत या अख्ख्या गावानेे आमसभेत ठराव घेत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेेतला. जिल्हाधिकारी, निवडणूक अधिकारी, मुख्यमंत्री व पंतप्रधान कार्यालयांपर्यंत निवेदने देऊन कळविले. विशेष म्हणजे या निर्णयाला येथील महिलांचाही पाठिंबा आहे.
राजकीय पक्षांना प्रचारासाठी ‘नो एन्ट्री’ -
आपली मागणी मान्य होईपर्यंत कुठल्याही राजपक्षाला प्रचारासाठी ‘नो एन्ट्री’ असेल, अशी भूमिका गावकऱ्यांनी घेेतली आहे. गावात प्रचाराचे वाहन शिरू नये म्हणून मुख्य गेेटजवळ युवक बसलेले असतात. लोकमत प्रतिनिधीने येथेे भेट दिली असता भाजपचे होर्डिंग घेऊन एक वाहन तेथे आले. गावकऱ्यांनी लगेेच ते गेटवरच थांबवले. मागणीचा फलक दाखवत परत पाठविले.
मुला-मुलींची शाळाही वेगवेेगळी -
या गावात ८वीपर्यंत मुला-मुलींची शाळाही वेगवेगळी होती. मुलांसाठी कुमार शाळा व मुलींसाठी कन्या शाळा. मात्र, गेेल्या सत्रात पटसंख्येेअभावी दोन्ही शाळा सरकारनेे एकत्र केल्या.
सरपंच म्हणतात, यापुढेही बहिष्कार! -
लोकमत प्रतिनिधीने गावचे सरपंच धर्मेद्रसिंह डी. जडेजा यांची भेट घेतली. त्यांनीही गावकऱ्यांच्या भूमिकेेचे समर्थन केलेे. ते म्हणाले, स्त्री व पुरुषांचेे मतदान वेगवेगळ्या केंद्रांवर घेण्याची रित येथे फार पूर्वीपासून आहे. मात्र चर्चा न करता मतदान केंद्र एकत्र केेले.
त्यामुळे आम्ही मतदानावर बहिष्काराचा निर्णय घेतला. सरकारने पूर्ववत स्थिती केेली नाही तर यापुढेही कुठल्याच निवडणुकीत मतदान न करण्याच्या भूमिकेवर गावकरी ठाम आहेत.