तरुण विसरभोळे का होताहेत! ३५ ते ४० वर्षे वयातच होतोय स्मृतिभ्रंश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2024 12:39 PM2024-08-31T12:39:58+5:302024-08-31T12:40:17+5:30

कमी वयात ब्रेन स्ट्रोक आणि स्मृतिभ्रंश होण्याचे प्रमाण वाढत आहे.

Why are young people suffering from amnesia | तरुण विसरभोळे का होताहेत! ३५ ते ४० वर्षे वयातच होतोय स्मृतिभ्रंश

तरुण विसरभोळे का होताहेत! ३५ ते ४० वर्षे वयातच होतोय स्मृतिभ्रंश

लोकमत न्यूज नेटवर्क. नवी दिल्ली : सध्या तरुणांमध्ये वृद्धांमध्ये विसरभोळेपणासाठी कारणीभूत ठरणारा व्हॅस्कूलर आणि  अल्झायमर डिमेंशिया आजार मोठ्या प्रमाणात वाढत आहे.  त्यामुळे  अनेक तरुण उपचारांसाठी डॉक्टरांकडे येत आहेत. 

डॉक्टरांच्या मते, सतत ताण  घेणे आणि एकाचवेळी अनेक कामे एकाचवेळी करणे (मल्टीटास्किंग) यामुळे तरुणाईमध्ये विस्मरणाचा आजार वाढला आहे. खराब अन्न, टेन्शन आणि अधिक वेळ मोबाईल आणि लॅपटॉपवर राहिल्याने मेंदूच्या नसांवर ताण वाढत आहे. त्यामुळे कमी वयात ब्रेन स्ट्रोक आणि स्मृतिभ्रंश होण्याचे प्रमाण वाढत आहे.

खराब जीवनशैलीमुळे तरुण तणावाखाली आहेत. ३५-४० व्या वर्षी ते वृद्धापकाळाच्या आजाराने त्रस्त आहेत. मेंदूला विश्रांती न दिल्यास मेंदूच्या नसांमध्ये अमॉइलाइड प्रोटीन जमा होते. त्यामुळे स्मरणशक्ती कमी होते. - डॉ. एम. सुकुमार, तज्ज्ञ

तुमच्यामध्ये आहेत का ही लक्षणे ? 
- काही वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारात जातो, पण तिथे गेल्यावर काय घ्यायचे तेच विसरतो.
- परीक्षेच्या तयारीसाठी खूप मेहनत घेत अभ्यास केला, मात्र पेपरमध्ये उत्तर लिहिताना अर्धी उत्तरे विसरलो.
- कधी कोणी खूप दिवसानंतर भेटला तर त्याचे नावच आठवत नाहीत.
- एका खोलीतून उठून दुसऱ्या खोलीत काही कामासाठी गेलो, पण तिथे पोहोचल्यावर कोणत्या कामासाठी आलो हेच विसरलो.

मोठ्या संस्थेत काम करीत असलेल्या एका अधिकाऱ्याला वयाच्या ४० व्या वर्षी स्मृतिभ्रंश झाला आहे. ते २४ कामांचाच विचार करतात, ते एकटे राहतात. त्यामुळे वृद्धांच्या आजाराने त्यांना घेरले.

एका आयटी कंपनीत काम करणारी ४१ वर्षीय सिंगल मदर कुटुंबासह ऑफिसच्या कामात व्यस्त असते. ऑफिसला निघताना अनेक वेळा ती तिच्या मुलाच्या शाळेत पोहोचते. त्यामुळे गडबड उडते.

Web Title: Why are young people suffering from amnesia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य