नितीश कुमारांनी असं का केलं?, घरोघरी जाऊन शरद यादव करणार चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2017 01:50 PM2017-08-10T13:50:49+5:302017-08-10T14:35:31+5:30

बिहारमध्ये राजकीय भूकंप आल्यानंतरही मौनव्रत धारण करुन बसलेले जेडीयूचे वरिष्ठ नेता शरद यादव यांनी आता उघडपणे आपली नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे

Why did Nitish Kumar do this? | नितीश कुमारांनी असं का केलं?, घरोघरी जाऊन शरद यादव करणार चर्चा

नितीश कुमारांनी असं का केलं?, घरोघरी जाऊन शरद यादव करणार चर्चा

Next
ठळक मुद्दे शरद यादव यांनी नितीश कुमार यांच्यावर सडेतोड टीका केली आहे'पाच वर्षांसाठी महाआघाडी करण्यात आली होती. 11 कोटी लोकांच्या विश्वासाला तडा गेला आहे'शरद यादव दौरा संपल्यानंतर एखादी मोठी घोषणा करु शकतात. 

पाटणा, दि. 10 - बिहारमध्ये राजकीय भूकंप आल्यानंतरही मौनव्रत धारण करुन बसलेले जेडीयूचे वरिष्ठ नेता शरद यादव यांनी आता उघडपणे आपली नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. शरद यादव यांनी नितीश कुमार यांच्यावर सडेतोड टीका केली आहे. नितीश कुमार यांनी भाजपाशी हातमिळवणी करण्याच्या निर्णयावर शरद यादव यांनी नाराजी व्यक्त केली आहे. राज्याचा दौरा करत आपण लोकांशी संवाद साधणार असल्याचं शरद यादव यांनी सांगितलं आहे. शरद यादव यांनी यावेळी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, 'पाच वर्षांसाठी महाआघाडी करण्यात आली होती. 11 कोटी लोकांच्या विश्वासाला तडा गेला आहे'.

शरद यादव गेल्या अनेक दिवसांपासून नितीश कुमार यांच्यावर नाराज असल्याचं वृत्त येत होतं. आरजेडीसोबत आपली मैत्री संपवत भाजपाच्या खांद्यावर हात ठेवून पुढे वाटचाल सुरु केल्याने शरद यादव नितीश कुमारांवर नाराज आहेत. दरम्यान शरद यादव जेडीयूमधून वेगळे होऊन आपला पक्ष उभा करतील अशा बातम्याही येत होत्या. जानकारांनी दर्शवलेल्या अंदाजानुसार, शरद यादव दौरा संपल्यानंतर एखादी मोठी घोषणा करु शकतात. 

{{{{twitter_post_id####



'ज्या जनतेसोबत आम्ही युती केली होती, त्यांच्यासोबत आम्ही करार केला होता,तो ईमानदारीने वागण्याचा होता. तो करार तुटला आहे, ज्यामुळे आम्हाला त्रास झाला आहे', असं शरद यादव बोलले आहेत. पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, 'निवडणुकीत एक जाहीरनामा जेडीयूचा होता, तर एक जाहीरनामा भाजपाचा होता. गेल्या 70 वर्षात असं कोणतंच उदाहरण पहायला मिळत नाही ज्यामध्ये दोन वेगवेगळ्या जाहीरनाम्यासहित पक्षांनी एकमेकांविरोधात निवडणूक लढवली, आणि आता ते जाहीरनामे एकत्र झाले आहेत'. 'लोकशाहीवर विश्वासाचं संकट असून, यावर लोकांमध्ये जाऊन चर्चा करणार असल्याचं', शरद यादव यांनी सांगितलं आहे. 


शरद यादव यांची नाराजी गेल्या खूप दिवसांपासून आहे. ट्विटरवरदेखील शरद यादव केंद्र सरकारच्या कामकाजावर टीका करत आहेत. मात्र अद्यापपर्यंत नितीश कुमार यांनी त्यांच्याविरोधात कोणतंच वक्तव्य केलेलं नाही. यामुळे येणा-या काही दिवसांमध्ये बिहारमध्ये पुन्हा एकदा राजकीय धक्के जाणवण्याची शक्यता नाकारता येत नाही.

}}}}

Web Title: Why did Nitish Kumar do this?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.