संजय लीला भन्साळीच्या चित्रपटाबद्दल इतके वाद का होतात ? - नाना पाटेकर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2017 01:34 PM2017-11-30T13:34:20+5:302017-11-30T13:42:35+5:30
पुण्यात एनडीएच्या दीक्षांत सोहळयात राज ठाकरेंच्या बोच-या टिकेला उत्तर देणारे अभिनेते नाना पाटेकर यांनी पद्मावतीच्या वादाबद्दलही भाष्य केले आहे.
पुणे - पुण्यात एनडीएच्या दीक्षांत सोहळयात राज ठाकरेंच्या बोच-या टिकेला उत्तर देणारे अभिनेते नाना पाटेकर यांनी पद्मावतीच्या वादाबद्दलही भाष्य केले आहे. दीपिका पादुकोण आणि संजय लीला भन्साळी यांना जीवे मारण्याची धमकी देणे पूर्णपणे चुकीचे आहे असे नाना पाटेकर म्हणाले. संजय लीला भन्साळीच्या चित्रपटांबद्दल इतके वाद का होतात ? या चित्रपटातील पात्र कशी साकारलीत त्याबद्दल मी आताच सांगू शकत नाही.
चित्रपट पाहिल्यानंतर मी याबद्दल संजय लीला भन्साळींशी बोलेने असे नाना पाटेकर म्हणाले. काही दिवसांपूर्वी गोव्यात 48 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्वामध्ये पत्रकारांशी बोलतानाही नानांनी आंदोलकांना चित्रपट पाहण्याचे आवाहन केले होते. चित्रपट पाहिल्यानंतर त्यात काय आहे ते समजेल. चित्रपट पाहिल्याशिवाय विरोध करणे चुकीचे आहे असे नाना पाटेकर त्यावेळी म्हणाले होते.
Why does controversy happen in his films? I don't know how the characters are portrayed as of now, I can tell this to Sanjay (Bhansali) only after watching the film: Nana Patekar on #Padmavatipic.twitter.com/eNMaXQivQk
— ANI (@ANI) November 30, 2017
या संपूर्ण वादात प्रत्येकजण आपआपला दृष्टीकोन मांडत आहे. जो पर्यंत चित्रपट प्रदर्शित होत नाही तो पर्यंत त्यात काय आहे हे आपल्याला कसं समजणार? त्यावेळी सुद्धा नानांनी दीपिका पादुकोण आणि संजय लीला भन्साळी यांना देण्यात येणा-या धमक्यांचा निषेध केला होता.
मुलायम सिंह यादव यांच्या सूनबाईंनी पद्मावतीमधील 'घुमर' गाण्यावर केला डान्स
सध्या पद्मावती चित्रपटावरुन देशभरात वाद सुरु आहे. मुलायम सिंह यादव यांच्या छोटया सूनबाई अपर्णा यादवही आता अडचणीत आल्या आहेत.अपर्णा यादव यांनी पद्मावती चित्रपटातील 'घुमर' गाण्यावर नृत्य सादर केले. लखनऊ येथील एका कार्यक्रमात अपर्णा यादव यांनी घुमर गाण्यावर डान्स केला. त्यांच्या नृत्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावरुन अनेकांनी अपर्णा यादव यांना धमकी दिली आहे.
भाजपा नेते सूरज पाल अमूनी दिली दीपिका पादुकोणला धमकी
हरियाणामधील भाजपाचे मीडिया प्रमुख संयोजक सूरज पाल अमू यांनी अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि संजय लीला भन्साळी यांचं शीर कापून आणणा-याला 10 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. याचवेळी त्यांनी सिनेमात अल्लाऊद्दीन खिलजीची भूमिका करणा-या रणवीर सिंहचे पाय तोडण्याचीही धमकी दिली आहे. 'आम्हाला कायदा घातात घ्यायचा नाहीये. पण जर कुणी आमच्या बहिणी आणि मुलींकडे नजर उचलून पाहिलं तर त्याला शिक्षा करण्यात येणार', असं सूरजपाल अम्मू म्हणाले होते.