का पेट घेतात इलेक्ट्रिक बाइक?; ई-बाईकच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2022 07:53 AM2022-04-29T07:53:01+5:302022-04-29T07:53:20+5:30

ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय) आणि इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी (आयसीएटी) या दोन संस्था भारतातील इलेक्ट्रिक गाड्यांना प्रमाणित करतात

Why electric bikes catch fire?; Question marks over e-bike safety | का पेट घेतात इलेक्ट्रिक बाइक?; ई-बाईकच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

का पेट घेतात इलेक्ट्रिक बाइक?; ई-बाईकच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

googlenewsNext

गेल्या काही दिवसांपासून इलेक्ट्रिक बाइकने अचानक पेट घेतल्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. आतापर्यंत अशा सात घटनांची नोंद झाली आहे. अशा परिस्थितीत ई-बाइकच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यासंदर्भात जाणून घेऊ या.

इलेक्ट्रिक वाहनबाजाराची स्थिती

२०१२ सरकारने ‘नॅशनल इलेक्ट्रिक मोबिलिटी मिशन प्लॅन २०२०’ योजना जारी केली. २०२०-२१ या काळात विक्री झालेल्या वाहनांमध्ये इलेक्ट्रिक गाड्यांचे १.३% प्रमाण हाेते. २०२१-२२ या कालावधीत विक्रीचे प्रमाण १.७% पोहोचले आहे. २०३० पर्यंत वाहन क्षेत्रात इलेक्ट्रिक गाड्यांच्या विक्रीचा हिस्सा ३०%पर्यंत पोहोचावा, अशी योजना आहे.

कोणत्या बॅटऱ्या वापरल्या जातात?
ई-बाइकमध्ये लिथियम-आयन अर्थात लि-आयन या बॅटऱ्या मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात.
स्मार्टफोन आणि लॅपटॉपमध्येही या बॅटऱ्यांचा वापर केला जातो.
इतर बॅटऱ्यांच्या तुलनेत या वजनाने हलक्या आणि अधिक कार्यक्षम असल्याचे मानले जाते.
या बॅटऱ्या चार्जिंगवेळी अधिक तापल्यानेच आतापर्यंतच्या दुर्घटना घडल्याचे निदर्शनास आले आहे.

इलेक्ट्रिक गाड्यांना कोण प्रमाणित करते?
ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय) आणि इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी (आयसीएटी) या दोन संस्था भारतातील इलेक्ट्रिक गाड्यांना प्रमाणित करतात. इलेक्ट्रिक गाड्यांच्या चाचण्यांबाबत तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.
चीनकडून आयात होणाऱ्या हलक्या दर्जाच्या सेलबाबत तज्ज्ञांनी निषेध केला असून हा प्रकार रोखण्यासाठी ठोस उपाययोजना गरजेच्या असल्याचे मत व्यक्त केले आहे.

ई-बाइकला आग लागू नये म्हणून...

ज्या कंपनीने ई-बाइक बनवली आहे त्यांच्या चार्जरनेच गाडीचे चार्जिंग करा. गाडी पाण्यात भिजली असेल तर लगेचच चार्जिंग करू नका. चीननिर्मित बॅटऱ्यांऐवजी भारतात तयार केलेल्या बॅटऱ्यांचा आग्रह धरा. गाडी रात्रभर चार्जिंगला ठेवू नका. ड्रायव्हिंगवेळी जळाल्याचा वास आल्यास दुर्लक्ष करू नका. लगेचच तपासणी करा.

Web Title: Why electric bikes catch fire?; Question marks over e-bike safety

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.