दोन गाढवांना घेऊन रस्त्यावर का फिरतायत माजी IAS अधिकारी? कारण जाणून थक्क व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 03:22 PM2024-08-20T15:22:16+5:302024-08-20T15:23:22+5:30

2001 च्या बॅचचे माजी आयएएस अधिकारी प्रवीण कुमार हरियाणातील फरीदाबादमध्ये राहतात. ते आपल्या दोन गाढवांसह फिरतात. ते सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहेत.

Why is an ex-IAS officer walking on the road with two donkeys You will be surprised to know the reason | दोन गाढवांना घेऊन रस्त्यावर का फिरतायत माजी IAS अधिकारी? कारण जाणून थक्क व्हाल

दोन गाढवांना घेऊन रस्त्यावर का फिरतायत माजी IAS अधिकारी? कारण जाणून थक्क व्हाल

केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) परीक्षा, ही देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते. या परीक्षेच्या माध्यमाने विद्यार्थी थेट देशाच्या प्रशासन व्यवस्थेत पोहचतात. देशभरातील अनेक विद्यार्थी आयएएस, आयपीएस अथवा तत्सम अधिकारी होण्यासाठी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्याचे स्वप्न बाळगून असतात. या सेवेत पहोचल्यानंतर, अनेक आयएएस, आयपीएस अधिकारी आपल्या कामातून प्रसिद्धीही मिळवतात. असेच एक माजी आयएएस अधिकारी म्हणजे प्रवीण कुमार, यांनी दोन गाढवांसह फिरण्याच्या आपल्या सवयीमुळे सोशल मीडियाचे लक्ष वेधले आहे.

2001 च्या बॅचचे माजी आयएएस अधिकारी प्रवीण कुमार हरियाणातील फरीदाबादमध्ये राहतात. ते आपल्या दोन गाढवांसह फिरतात. ते सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहेत. आयएएस अधिकारी प्रवीण कुमार हे हरियाणा केडरचे आयएएस अधिकारी राहिले आहेत. याशिवाय ते फरीदाबादचे उपायुक्त देखील होते. 

गाढवासोबत का फिरतात? -
हरियाणाचे माजी आयएएस प्रवीण कुमार बडखल विधानसभा मतदारसंघात फिरतात. त्यांचा फोटो सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. यासंदर्भात बोलताना प्रवीण कुमार म्हणतात, "आपण गाढवांच्या माध्यमाने लोकांना संदेश देऊ इच्छी तो की, त्यांनी त्यांची मानसिकता व्यवस्थित करायला हवी. त्यांच्या मते, सध्याच्या धावपळीच्या जगात मानव आपल्या विचारांवरील नियंत्रण गमवत चालला आहे. 

प्रवीण कुमार अशा अंदाजात दिसण्याची ही पहिलीच वेळ आहे, असे नाही. तर प्रशासकीय सेवेत असतानाही ते त्यांच्या विशेष शैलीमुले चर्चेत असत. आता निवृत्तीनंतर ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ते आता गाढवांसह रस्त्यावर उतरून लोकांना जागरुक करत आहेत. 

Web Title: Why is an ex-IAS officer walking on the road with two donkeys You will be surprised to know the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.