पौर्णिमेच्या रात्री रस्त्यांवर लाइट हवेत कशाला ?
By admin | Published: April 7, 2015 04:27 AM2015-04-07T04:27:54+5:302015-04-07T04:27:54+5:30
सर्व राज्यांच्या पर्यावरणमंत्र्यांसाठी आयोजित केलेल्या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पर्यावरण अणि परंपरेची नाळ खुबीने जोडली
नवी दिल्ली : सर्व राज्यांच्या पर्यावरणमंत्र्यांसाठी आयोजित केलेल्या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पर्यावरण अणि परंपरेची नाळ खुबीने जोडली. त्याच्या साक्षात्कारासाठी त्यांनी काही गोष्टीवेल्हाळ दाखले दिले. पौर्णिमेच्या रात्री रस्त्यांवर लाइट हवेत कशाला, असा सवालही त्यांनी केला.
गोधडीची आठवण
पर्यावरणावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी अचानक गतकाळाच्या स्मृतीत रमले. आज जगात पुनर्वापर (रिसायकलिंग)चे फॅड आले आहे. पण भारतात पूर्वापार हे चालत आले आहे. जुन्या कपड्यांचा वापर घराच्या स्वच्छतेसाठी केला जायचा. हे रिसायकलिंगच होते. ती आमची परंपरा होती, असे मोदी म्हणाले.
पौर्णिमेचं चांदणं बघितलंय?
आधी पौर्णिमेच्या रात्री बच्चेकंपनी अंगणात जमायची आणि आजी आपल्या नातवंडांना सुईत दोरा ओवायला लावायची. त्या रात्रीचे ते नयनरम्य दृश्य नातवंडांना दाखवणे, त्याची अनुभूती घ्यायाला शिकवणे, हा तिचा यामागचा खरा उद्देश असायचा. पण आज आपण निसर्गापासून दूर जात आहोत. आज नव्या पिढीला आपण क्वचितच अशी अनुभूती देत असू, असे ते म्हणाले.