'हिंदुस्तान, इंडिया ठेवले असते, शिवशक्ती का'? चंद्रयान-3 च्या लँडिंग प्वाइंटला दिलेल्या नावावरून मौलाना सैफ यांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2023 02:24 PM2023-08-26T14:24:19+5:302023-08-26T14:25:16+5:30
Chandrayaan-3 On Moon: चंद्रयान- 3 लँडिग झालेली जागा आता शिवशक्ती नावाने ओळखले जाईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (26 ऑगस्ट) केली.
चंद्रयान-3 ने चंद्राच्या साउथ पोलवर लँडिंग केले आणि असा पराक्रम करणारा भारत पहिला, तर चांद्रावर पोहोचलेल्या देशांपैकी चौथा देश बनला. या यशानंतर, लँडिग झालेली जागा आता शिवशक्ती नावाने ओळखले जाईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (26 ऑगस्ट) केली. यावर मौलाना सैफ अब्बास नकवी यांनी भाष्य केले आहे.
मौलाना सैफ अब्बास नकवी म्हणाले, आपल्या देशाच्या शास्त्रज्ञांनी आणि इंडियन रिसर्च ऑर्गेनायझेशनने जे यश मिळवले. ते देशाचे यश आहे. याला अशा प्रकारे नाव देणे योग्य नाही. जेथे विक्रम लँडर लँड करण्यात आले, त्या जागेचे नाव भारत ठेवायला हवे होते. हिंदुस्तान ठेवले असते, इंडिया ठेवले असते. ते अधिक चांगले झाले असते.
पंतप्रधान मोदींनी काय घोषणा केली? -
खरे तर, चंद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगवेळी पीएम मोदी परदेश दौऱ्यावर होते. यानंतर, दिल्लीत येण्यापूर्वी ते थेट बेंगळुरूमध्ये इस्रो सेंटरमध्ये गेले. यावेळी वैज्ञानिकांचे अभिनंद करताना आता 23 ऑगस्ट हा नॅशनल स्पेस डे म्हणून साजरा केला जाईल अशी घोषणा त्यांनी केली.
याच बरोबर, पंतप्रधान म्हणाले, "चंद्राच्या ज्या भागावर आपले चंद्रयान उतरले आहे, त्या भागाचे नावही भारताने ठरवले आहे. चंद्रयान-3 लँड झाले, ते ठिकाण आता 'शिवशक्ती' म्हणून ओळखले जाईल. तसेच चंद्रावरील ज्या पॉईंटवर चांद्रयान-2 चे ठसे सोडले त्या ठिकाणाला आता 'तिरंगा' म्हणून ओळखले जाईल. हा तिरंगा पॉईंट भारताच्या प्रत्येक प्रयत्नाची प्रेरणा बनेल, हा तिरंगा पॉईंट आपल्याला शिकवेल की कोणतेही अपयश अंतिम नसते."