International Nurses Day 2020 : ...म्हणून 'या' राज्यातील नर्सना आहे जगभरात पसंती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 02:15 PM2020-05-12T14:15:21+5:302020-05-12T14:46:07+5:30

विशेष म्हणजे भारताचा एक भाग नर्सिंग व्यवसायासाठी प्रसिद्ध आहे.

why nurses from kerala are most in demand corona lockdown vrd | International Nurses Day 2020 : ...म्हणून 'या' राज्यातील नर्सना आहे जगभरात पसंती

International Nurses Day 2020 : ...म्हणून 'या' राज्यातील नर्सना आहे जगभरात पसंती

Next
ठळक मुद्देआंतरराष्ट्रीय नर्स डे केवळ भारतातच नव्हे, तर 12 मे रोजी संपूर्ण जगभरात साजरा केला जातो. आज परिचारिका दिनाच्या दिवशी कोरोनाशी लढा देणाऱ्या नर्सचं सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे. दक्षिण भारतात केरळ हे एकमेव राज्य आहे, जिथे नर्सिंग प्रोफेशनला सर्वाधिक पसंती दिली जाते.

नवी दिल्लीः आंतरराष्ट्रीय नर्स डे केवळ भारतातच नव्हे, तर 12 मे रोजी संपूर्ण जगभरात साजरा केला जातो. आज परिचारिका दिनाच्या दिवशी कोरोनाशी लढा देणाऱ्या नर्सचं सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे. विशेष म्हणजे भारताचा एक भाग नर्सिंग व्यवसायासाठी प्रसिद्ध आहे. दक्षिण भारतात केरळ हे एकमेव राज्य आहे, जिथे नर्सिंग प्रोफेशनला सर्वाधिक पसंती दिली जाते. केवळ राज्यातील महिलांनाच हा व्यवसाय आवडत नाही, तर या राज्यातील नर्सना देखील जगभरात पसंती आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, समर्पण, बुद्धिमत्ता आणि वक्तशीरपणाच्या बाबतीत दक्षिण भारतातील परिचारिकांना तोड नाही. दक्षिण भारतातील बहुतेक स्त्रिया नर्सिंगमध्ये करिअर बनवण्यासाठी उत्सुक असतात. यामागील एक कारण म्हणजे केरळ, कर्नाटकमध्ये शेकडो नर्सिंग कॉलेज आणि इतर संस्था आहेत, ज्या दरवर्षी नर्सना प्रशिक्षण देत असतात. नर्सिंग अभ्यास तिथे आवडीनं शिकवला जातो.

शेजारील देश अनेकदा केरळमधील नर्सिंग विद्यार्थ्यांचे निरीक्षण करतात. त्यांना असा विश्वास आहे की, इथल्या नर्सिंगच्या विद्यार्थिनी पेशाला वाहून घेतात आणि भावनेने काम करतात. त्यांची कार्यक्षमता खूप उत्कृष्ट आहे. त्यामुळे परदेशात भारतीय परिचारिकांना जास्त मागणी आहे.आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे केरळमध्ये साक्षरता खूप जास्त आहे आणि इतर राज्यांपेक्षा स्त्रियांचे प्रमाणही जास्त आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि हार्ट केअर फाऊंडेशनचे संस्थापक सदस्य पद्मश्री डॉ. केके अग्रवाल म्हणतात की, आवड म्हणून या व्यवसायाला प्राधान्य देत नर्सिंग व्यवसायात जाणे सर्वात महत्त्वाचे आहे.

जर आपण हा व्यवसाय करिअर आणि आवड म्हणून स्वीकारला असेल तरच आपण तिथे चांगलं काम करू शकता. दक्षिण भारतातील बहुतेक स्त्रियांना बालपणापासूनच या व्यवसायाची आवड आहे. याच कारणास्तव केरळच्या परिचारिकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर पसंती दिली जाते. कोरोनासारख्या आजाराच्या वेळी केरळने उत्तम आरोग्य सेवा आणि परिचारिकांच्या समर्पित भावनेमुळे कोरोनावर नियंत्रण मिळवलं आहे. 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : येत्या दोन ते तीन दिवसांत सरकार नवं पॅकेज देणार, नितीन गडकरींचं मोठं विधान

CoronaVirus : निसर्गाचा चमत्कार! बिजनौरहून स्पष्ट दिसतोय नैनितालचा पर्वत

चीनच्या हेलिकॉप्टर्सची LACच्या हद्दीत घुसखोरी, भारतीय IAF लढाऊ विमानांनी लावलं हुसकावून

दोन माजी पंतप्रधानांविरोधात ट्विटरवर आक्षेपार्ह लिहिल्यानं भाजपाच्या संबित पात्रांविरोधात गुन्हा दाखल

भारतीय जवानांशी सिक्कीममध्ये भिडल्यानंतर चीननं दिली अशी प्रतिक्रिया

लॉकडाऊन वाढवणं अर्थव्यवस्थेसाठी आत्मघातकी ठरेल- आनंद महिंद्रा

CoronaVirus News : चिनी हॅकर्सकडून कोरोनाच्या संशोधनासंबंधी माहिती चोरण्याचा प्रयत्न, अमेरिकेचा गंभीर आरोप

Web Title: why nurses from kerala are most in demand corona lockdown vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.