मी तुला का डेट करू? तरुणीचा टिंडर मॅचला सवाल; तरुणाने अशी ट्रिक वापरले की सर्वच अवाक्
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2024 01:32 PM2024-01-29T13:32:10+5:302024-01-29T13:32:49+5:30
एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तमन्ना नावाच्या महिला युजरने एक स्टोरी शेअर केली आहे.
अलीकडच्या काळात डेटिंग कल्चरमध्ये मोठा बदल घडला असून तरुणाई राइट किंवा लेफ्ट स्वाइप करत आपली आवड-नावड दर्शवत असते. टिंडर, ग्रिंडर आणि बम्बलसारख्या अॅप्सच्या माध्यमातून डेटिंगचे प्रमाण वाढले आहे. या अॅप्सच्या माध्यमातून मुलाला किंवा मुलीला इम्प्रेस करण्यासाठी वेगवेगळे हातखंडे अवलंबले जातात. अशाच काहीसा प्रकार समोर आला असून एका तरुणाने तरुणीला इम्प्रेस करण्यासाठी वापरलेली ट्रिक आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.
एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तमन्ना नावाच्या महिला युजरने एक स्टोरी शेअर केली आहे. सदर महिलेने या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, मी तुला का डेट करावं, असं तिने तिच्या टिंडर मॅचला विचारलं होतं. त्यावर तरुणाने थेट पीपीटी प्रेझेन्टेशन तयार करून पाठवलं. या प्रेझेन्टेशनचे स्क्रीनशॉट शेअर करत तमन्नाने म्हटलंय की, "या प्रेझेन्टेशनमध्ये तरुणाने त्याच्या छंदांविषयी सांगितलं आहे. त्याला वेगवेगळ्या प्रकारचे अन्नपदार्थ खाण्याची आवड आहे. तसंच मी श्वानप्रेमी असल्याचंही त्याने सांगितलं आहे."
Asked my tinder match why should i date him and he sent me a link to this ppt 😭🙏 pic.twitter.com/P1FLyq0BTY
— tamanna (@hotgirllcoachh) January 27, 2024
दरम्यान, तरुणाने आपल्याला आवडत असलेल्या तरुणाला इम्प्रेस करण्यासाठी थेट प्रेझेन्टेशनच तयार केल्याने या प्रकाराची सोशल मीडियावर तुफान चर्चा होत असून तरुणीने शेअर केलेल्या पोस्टवर कमेंट्सचा पाऊस पडत आहे.