विधवेनं सेक्सला नकार दिल्यानं "त्या"नं केलं अमानुष कृत्य

By admin | Published: April 25, 2017 11:17 AM2017-04-25T11:17:01+5:302017-04-25T11:22:33+5:30

झारखंडमधल्या लातेहार जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

The widow rejected the sex, "she" did not do anything inhuman | विधवेनं सेक्सला नकार दिल्यानं "त्या"नं केलं अमानुष कृत्य

विधवेनं सेक्सला नकार दिल्यानं "त्या"नं केलं अमानुष कृत्य

Next

ऑनलाइन लोकमत
लातेहार, दि. 25 - झारखंडमधल्या लातेहार जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका विधवा महिलेनं सेक्सला नकार दिल्यानं एका व्यक्तीनं अमानवीयरीत्या त्या महिलेच्या गुप्तांगात बॉटल घुसवली. त्या विधवा महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. लातेहार जिल्ह्यात गेल्या आठवड्यात ही अमानुष घटना घडली आहे.

गुप्तांगात बॉटल घुसवल्यानंतर महिलेला तातडीनं लातेहार रुग्णालयात नेण्यात आलं. त्यानंतर विधवा महिलेला पुढच्या उपचारासाठी रांचीच्या राजेंद्र इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्स (रिम्स)मध्ये हलवण्यात आलं होतं. मात्र तिकडेच त्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. महिलेच्या मृत्यूनंतर तिच्या नातेवाईकांनी आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा देण्याची मागणी केली असून, आरोपीच्या घराबाहेर आंदोलनही केलं आहे. आरोपी सुदर्शन ठाकूरला पोलिसांनी अटक केली आहे.

लातेहारचे पोलीस उपअधीक्षक पीयूष पांडे म्हणाले, शोभा देवी नावाच्या महिलेचे सुदर्शन ठाकूर या व्यक्तीसोबत काही खासगी वाद सुरू होते. गेल्या आठवड्यात या वादाचं पर्यावसन धक्काबुक्की आणि हाणामारीपर्यंत गेले. त्यानंतर सुदर्शननं महिलेला धक्का देऊन खाली पाडलं आणि तिच्या पोटावर लाथ मारली. त्यानंतर त्या महिलेवर बळजबरी करण्याचाही त्यानं प्रयत्न केला. मात्र महिलेनं विरोध करताच त्यानं तिच्या गुप्तांगामध्ये एक बॉटल घुसवली. गंभीर जखमी असलेल्या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. महिलेनं दोन दिवसांपूर्वीच रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीच्या विरोधात हत्येचा गुन्हा नोंद करून त्याला अटक केली आहे.

Web Title: The widow rejected the sex, "she" did not do anything inhuman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.