अरेरे! भांडण झालं, 6 सेकंदांत 6 वेळा मारलं; 'तिने' भररस्त्यात पतीला चपलेने चोप चोप चोपलं

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2022 12:24 PM2022-11-03T12:24:48+5:302022-11-03T12:30:27+5:30

एका महिलेने आपल्या पतील भररस्त्यात चपलेने चोप चोप चोपलं आहे. वाद झाल्यावर तिने 6 सेकंदांत 6 वेळा मारल्याचं पाहायला मिळत आहे.

wife beats husband with slippers in the market in hamirpur video viral | अरेरे! भांडण झालं, 6 सेकंदांत 6 वेळा मारलं; 'तिने' भररस्त्यात पतीला चपलेने चोप चोप चोपलं

अरेरे! भांडण झालं, 6 सेकंदांत 6 वेळा मारलं; 'तिने' भररस्त्यात पतीला चपलेने चोप चोप चोपलं

googlenewsNext

उत्तर प्रदेशातील हमीरपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. पती-पत्नीमध्ये अनेकदा छोट्या मोठ्या गोष्टीवरून वाद होतात. काही वाद हे टोकाला जातात, असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. एका महिलेने आपल्या पतीला भररस्त्यात चपलेने चोप चोप चोपलं आहे. वाद झाल्यावर तिने 6 सेकंदांत 6 वेळा मारल्याचं पाहायला मिळत आहे. या जोडप्यामध्ये आधीपासून वाद असल्याचं सांगण्यात येत आहे. 

पती-पत्नी सुनावणीसाठी कोर्टात आले होते. कोर्टातून बाहेर पडल्यानंतर रस्त्यावर काही कारणावरुन त्यांच्यात वाद झाला. यानंतर महिलेने तिच्या मैत्रिणीसह पतीला चपलेने मारहाण करण्यास सुरुवात केली. मिळालेल्या माहितीनुसार, कोर्टात केसची सुनावणी झाल्यानंतर पती गावी जाण्यासाठी बस स्टँडवर आला होता. यावेळी त्याची पत्नीही तिच्या मैत्रिणीसोबत आली होती. यादरम्यान, दोघांमध्ये बाचाबाची झाली.

पत्नीच्या मैत्रिणीने थेट पायातील चप्पल काढून पतीला मारहाण केली. त्यानंतर या पत्नीनेही पतीला चपलेने मारायला सुरुवात केली. अवघ्या सहा सेकंदात पत्नीने सहावेळा पतीला चप्पलने तोंडावर मारलं. यानंतर दोन्ही महिला पतीला शिवीगाळ करत तेथून निघून गेल्या. या घटनेचे व्हि़डीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हे भांडण पाहण्यासाठी लोकांनी देखील गर्दी केली होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: wife beats husband with slippers in the market in hamirpur video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.