‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 15:55 IST2025-04-24T15:55:24+5:302025-04-24T15:55:48+5:30
Uttar Pradesh Crime News: गेल्या काही दिवसांपासून अनैकित संबंधांमधून घडलेले अनेक अनेक गुन्हे उघडकीस येत आहेत. त्यात काही महिलांनी विवाहबाह्य संबंधांमधून पतीची हत्या केल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. दरम्यान, उत्तर प्रदेशमधील मेरठ येथे अशीच एक धक्कादायक घडली आहे.

‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले
गेल्या काही दिवसांपासून अनैकित संबंधांमधून घडलेले अनेक अनेक गुन्हे उघडकीस येत आहेत. त्यात काही महिलांनी विवाहबाह्य संबंधांमधून पतीची हत्या केल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. दरम्यान, उत्तर प्रदेशमधील मेरठ येथे अशीच एक धक्कादायक घडली आहे. येथील एका प्रकाशन कंपनीत व्यवस्थापक म्हणून काम करणाऱ्या गौरव शर्मा याने त्याची पत्नी रितांशी शर्मा उर्फ रीतू हिच्यावर गंभीर आरोप केले आहेत. गौरव याने याबाबत मेरठच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना पत्र लिहून आपल्याला संरक्षण देण्याची मागणी केली आहे.
गौरव शर्मा याने सांगितले की, त्याचं लग्न २०१२ मध्ये हिंदू रीतीरिवाजानुसार रितांशी हिच्यासोबत झालं होतं. सुरुवातीला आम्ही एकत्र कुटुंबार राहिलो. मात्र नंतर काही वादविवाद आणि रितांशीच्या स्वैर वागण्यामुळे वेगळं राहू लागलो. त्यानंतरही रितांशी हिच्या वागण्यात काही फरक पडला नाही. रितांशी ही अनेक दिवस घरातून गायब असते. तसेच आपल्या अनुपस्थितीत काही मित्रांना घरी बोलावून त्यांच्यासोबत नशेच्या धुंदीत अश्लील वर्तन करते, असा आरोप गौरव याने केला.
रितांशी हिच्या वागण्याबाबत शेजाऱ्यांकडून माहिती मिळाल्यावर गौरव याने त्याचा १२ वर्षांचा पुतण्या वंश शर्मा याला घरी आणून ठेवले होते. त्यानेही रितांशी हिच्या गैरवर्तनाबाबत काका गौरव याला माहिती दिली. ‘’जेव्हा काका घरी नसातो, तेव्हा घरामध्ये वाईट लोक येतात. ते दरवाजा बंद करून मद्यपान करून अश्लील बोलतात’’, अशी माहिती त्याने दिली. त्यानंतर गौरवने जेव्हा पत्नीचा मोबाईल तपासला तेव्हा त्याच्या पायाखालची वाळूच सरकली. इंन्स्टाग्राम, फेसबूक आणि स्नॅपचॅटवर पत्नीचे आशिष उर्फ सनी, राज वर्मा, लव चौहान, कुलदीप चौधरी आणि अमन सिंह या तरुणांसोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती त्याला मिळाली. आपल्याकडे पत्नीविरोधात १२०० पानांचे डिजिटल पुरावे आहेत, असा दावाही त्याने केला. एवढंच नाही तर पत्नी रितांशी हिच्याकडे २ बेकायदेशीर पिस्तूल आहेत. ती तिच्या मित्राची आहेत, असा दावाही गौरव याने केला.