"दर महिन्याला 5 हजार घेईन"; सासरी राहण्यासाठी पत्नीने पतीसमोर ठेवली अनोखी अट अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2022 08:42 PM2022-08-13T20:42:58+5:302022-08-13T20:50:09+5:30

पतीसोबत सासरी राहण्यासाठी अनोखी अट घातली आहे. पतीने दर महिना पाच हजार रुपये दिले तरच सासरी राहीन असं पत्नीने म्हटलं आहे.

wife made condition to live in lawas house said i will take 5 thousand rupees every month from husband | "दर महिन्याला 5 हजार घेईन"; सासरी राहण्यासाठी पत्नीने पतीसमोर ठेवली अनोखी अट अन्...

"दर महिन्याला 5 हजार घेईन"; सासरी राहण्यासाठी पत्नीने पतीसमोर ठेवली अनोखी अट अन्...

Next

नवी दिल्ली - बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यात एक अजब घटना समोर आली आहे. कौटुंबिक समुपदेशन केंद्रात एक अशी घटना समोर आली आहे जी पाहून सर्वच जण हैराण झाले आहे. महिलेने पतीसोबत सासरी राहण्यासाठी अनोखी अट घातली आहे. पतीने दर महिना पाच हजार रुपये दिले तरच सासरी राहीन असं पत्नीने म्हटलं आहे. ही अट ठेवण्यामागे तिला जेव्हा कारण विचारलं. तेव्हा तिने पती मला सोडून पैसे कमावण्यासाठी दिल्ली-पंजाबमध्ये जातो. इथे मी कसं घर चालवते ते माझं मला माहीत असं सांगितलं. 

महिलेने दिलेल्या माहितीनुसार, "मी सासरी राहायला तयार आहे. पण मला दर महिन्याला माझ्या पतीने 5 हजार रुपये द्यायला हवेत." पतीने देखील पत्नीची ही अट मान्य असल्याचं म्हटलं आहे. तसेच बाहेर जाताच पहिलं पत्नीच्या नावाने खातं सुरू करून त्यात पैसे जमा करेन असं म्हटलं आहे. पाच हजार देईन असं आश्वासन देखील दिलं आहे. यानंतर कौटुंबिक समुपदेशन केंद्राने एक बाँड तयार करून दोन्ही बाजुच्या लोकांकडून त्यावर सही घेतली आहे. 

कौटुंबिक समुपदेशन केंद्राने दिलेल्या सल्ल्यानंतर पत्नी देखील पतीसह सासरी राहण्यास तयार झाली आहे. तसेच पतीने देखील तिचं म्हणणं मान्य केलं आहे. या घटनेची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली. कौटुंबिक समुपदेशन केंद्राने 12 ऑगस्ट रोजी जवळपास 25 प्रकरणांवर सुनावणी केली. ज्यातली 12 प्रकरणं निकाली लागली. तर काहींना काहीच मार्ग न मिळाल्याने त्यांना कोर्टात जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: wife made condition to live in lawas house said i will take 5 thousand rupees every month from husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.