पत्नीवरील बलात्कार हा कायदा भारतासाठी गैरलागू - केंद्र सरकार
By admin | Published: April 30, 2015 09:27 AM2015-04-30T09:27:08+5:302015-04-30T09:32:32+5:30
भारतीय समाजात लग्न हे पवित्र संस्कार मानले जात असल्याने विवाहांतर्गत बलात्कार ही संकल्पना भारतात लागू होऊ शकत नाही असे स्पष्टीकरण केंद्र सरकारने संसदेत दिले आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३० - भारतीय समाजात लग्न हे पवित्र संस्कार मानले जात असल्याने विवाहांतर्गत बलात्कार ही संकल्पना भारतात लागू होऊ शकत नाही असे स्पष्टीकरण केंद्र सरकारने संसदेत दिले आहे. पत्नीवरील बलात्कार हा फौजदारी गुन्हा ठरवण्याचा कोणताही विचार नसल्याचे केंद्रीय गृहराज्य मंत्र्यांनी संसदेत स्पष्ट केले आहे.
लोकसभेत डीएमकेच्या खासदार कनिमोळी यांनी गृहमंत्रालयाला विवाहांतर्गत संबंधांमध्ये पत्नीवर होणारा बलात्कार, त्यासंदर्भातील कायदे व केंद्र सरकारची भूमिका काय असा सवाल उपस्थित करण्यात आला होता. या प्रश्नावर उत्तर देताना केंद्रीय गृहराज्यमंत्री हरिभाई चौधरी म्हणाले, पत्नीवर बलात्कार ही संकल्पना आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचलित असली तरी भारतात ही संकल्पना लागू होऊ शकत नाही. भारतातील शिक्षणाचा स्तर, निरक्षरता, गरीबी, सामाजिक परंपरा, धार्मिक मान्यता, समाजाची विचारधारा आणि लग्नाला पवित्र मानणे अशा अनेक बाबी लक्षात घेता पत्नीवर बलात्कार ही संकल्पना भारतात गैरलागू ठरते असेही चौधरी यांनी स्पष्ट केले. संयुक्त राष्ट्राच्या महिला अत्याचारविरोधी समितीने भारतात पत्नीवरील बलात्कार हे बलात्कारविरोधी कायद्याच्या कक्षेत आणावे अशी शिफारस केली आहे असे त्यांनी नमूद केले.