पत्नीला सार्वजनिक ठिकाणी थप्पड मारली, प्रकरण कोर्टात गेलं; वाचा उच्च न्यायालय काय म्हणालं?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2024 03:19 PM2024-02-23T15:19:48+5:302024-02-23T15:20:40+5:30
पती आणि पत्नी यांच्यात काही वाद सुरू होता. पत्नीने दावा केला आहे की, ती या प्रकरणाच्या सुनावणीसाठी जेव्हा फॅमिली कोर्टात पोहोचली, तेव्हा तिच्या पतीने तिला सर्वाजनिक ठिकाणी थप्पड मारली. या घटनेसंदर्भात पती विरोधात IPC च्या कलम 323 आणि 354 अंतर्गत तक्रार दाखल कण्यात आली आहे.
भारतीय दंड संहिता अर्थात IPC च्या कलम 354 अंतर्गत पत्नीला सार्वजनिक ठिकाणी थप्पड मारणे, म्हणजे तिच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवण्याचा अपराध नाही. असे जम्मू-काश्मीर आणि लद्दाख उच्च न्यायालयने एका व्यक्तीच्या याचिकेवर सुनावणी करताना म्हटले आहे. या याचिकेच्या माध्यमाने ट्रायल कोर्टाकडून इश्युएंस ऑफ प्रोसेसला आव्हान देण्यात आले होते. सुनावणीवेळी न्यायालयाने ट्रायल कोर्टाचे इश्युएंस ऑफ प्रोसेस फेटाळून लावले आहे. मात्र, कलम 323 अंतर्गत कारवाई कायम ठेवण्यात आली आहे.
काय होतं प्रकरण? -
पती आणि पत्नी यांच्यात काही वाद सुरू होता. पत्नीने दावा केला आहे की, ती या प्रकरणाच्या सुनावणीसाठी जेव्हा फॅमिली कोर्टात पोहोचली, तेव्हा तिच्या पतीने तिला सर्वाजनिक ठिकाणी थप्पड मारली. या घटनेसंदर्भात पती विरोधात IPC च्या कलम 323 आणि 354 अंतर्गत तक्रार दाखल कण्यात आली.
काय घडलं उच्च न्यायालयात? -
पतीच्या याचिकेवर सुनावणी करणारे जस्टिस रजनीश ओसवाल म्हणाले, IPC च्या कलम 354 अंतर्गत हा गुन्हा होऊ शकत नाही. मात्र, जाणूनबुजून एखाद्याला हानी पोहोचवणे हा IPC च्या कलम 323 अंतर्गत अपराध होऊ शकतो, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
न्यायालयाच्या आदेशानुसार, 'तक्रारीमध्ये सांगण्यात आल्या प्रमाणे, IPC च्या कलम 354 अंतर्गत गोन्हा होत नाही. मात्र हा IPC च्या कलम 323 अंतर्गत गुन्हा होऊ शकतो. कारण प्रतिवादीने स्पष्टपणे नमूद केले आहे की, ती जेव्हा कारवाईमध्ये सहभागी होण्यासाठी आली होती, तेव्हा याचिकाकर्त्याने तिला लोकांसमोर मारहाण केली आणि थप्पड मारली.
महत्वाचे म्हणजे, महिलेच्या वतीने उपस्थित असलेल्या वकिलाने, आयपीसीच्या कलम 354 नुसार हा गुन्हा होऊ शकत नाही. मात्र आयपीसीच्या कलम 323 चा येथे विचार केला जाऊ शकतो, असेही मान्य केले आहे.