पतीला रात्रीच्यावेळी प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये पकडलं; संतापलेल्या पत्नीने 'चपले'ने शिकवला धडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2023 15:43 IST2023-02-09T15:43:08+5:302023-02-09T15:43:56+5:30
उत्तर प्रदेशातील आग्रा येथून एक अनोखी घटना समोर आली आहे.

पतीला रात्रीच्यावेळी प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये पकडलं; संतापलेल्या पत्नीने 'चपले'ने शिकवला धडा
आग्रा : उत्तर प्रदेशातील आग्रा येथून एक अनोखी घटना समोर आली आहे. इथे बुधवारी संध्याकाळी पत्नीने पतीला प्रेयसीसह आग्रा येथील सिकंदरा हायवेवर असलेल्या हॉटेलमध्ये पकडले. संतापलेल्या पत्नीने दोघांनाही मारहाण करून राडा घातला. ही घटना रात्री 8.30 च्या सुमारास घडली. पत्नीचा संताप पाहून प्रेयसीने तिथून पळ काढण्यात यश मिळवले. पत्नीने हॉटेलमध्ये गोंधळ घातल्याने एकच खळबळ माजली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले.
दरम्यान, सिकंदरा भागातील एक तरुण त्याच्या प्रेयसीला 'गुरु का ताल'जवळील हॉटेलमध्ये घेऊन आला होता. हा प्रकार पत्नीला कळला आणि गोंधळ उडाला. पत्नी हॉटेलमध्ये पोहोचली. लक्षणीय बाब म्हणजे पत्नीने पतीला प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये रंगेहाथ पकडले. संतापलेल्या पत्नीने दोघांना मारहाण करण्यास सुरुवात केली. तेवढ्यात प्रेयसीने संधी मिळताच तिथून पळ काढला. यानंतर महिलेने एकच गोंधळ घातला. हॉटेलचे कर्मचारी देखील तेथून पसार झाले. तेवढ्यात पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मध्यस्थी करून प्रकरण शांत केले.
स्थानिक पोलीस निरीक्षक सिकंदर आनंद कुमार शाही यांनी सांगितले की, एका मुलीवरून पती-पत्नीमध्ये वाद झाल्याच्या माहितीवरून पोलीस तिथे गेले होते. मात्र, महिलेने कोणतीही तक्रार दिलेली नाही.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"