दहशतवाद्याला समजावण्यासाठी घेतली पत्नीची मदत. पण

By admin | Published: March 10, 2017 12:07 AM2017-03-10T00:07:06+5:302017-03-10T00:07:06+5:30

आज जम्मू आणि काश्मीरमध्ये गुरुवारी झालेल्या एका चकमकीत दहशतवाद्याला जिवंत पकडण्यासाठी लष्कराने त्या दहशतवाद्याच्या

Wife's help to understand the terrorists Well | दहशतवाद्याला समजावण्यासाठी घेतली पत्नीची मदत. पण

दहशतवाद्याला समजावण्यासाठी घेतली पत्नीची मदत. पण

Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 9 -  आज जम्मू आणि काश्मीरमध्ये गुरुवारी झालेल्या एका चकमकीत दहशतवाद्याला जिवंत पकडण्यासाठी लष्कराने त्या दहशतवाद्याच्या पत्नीची मदत घेतली. पण त्या दहशतवाद्याला जिवंत पकडण्याच्या प्रयत्नांना अपयश आले. पत्नीने समजावल्यानंतरही या दहशतवाद्याने आत्मसमर्पण केले नाही. अखेर लष्कराने चकमकीत या दहशतवाद्याला ठार मारले. 
जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील पडगमपोरा जिल्ह्यात बुधवारी रात्रीपासून गुरुवारी सकाळपर्यंत सुरू असलेली चकमक गुरुवारी सकाळी संपली. या चकमकीत लष्कराने दोन दहशतवाद्यांना ठार मारले. चकमक सुरू असतानाच शफीक शेरगुजारी याच्या कुटुंबीयांन लष्कराने घटनास्थळी आणले. या दहशतवाद्याने शरणागती पत्करल्यास त्याला ठार मारण्यात येणार नाही असे लष्कराने सांगितले होते. त्यानंतर या दहशतवाद्याच्या पत्नीने त्याला लष्करासमोर शरणागती पत्करण्याचे आवाहन केले. पण तो ऐकला नाही. त्याने गोळीबार सुरूच ठेवला. अखेर लष्कराने त्याला ठार केले.

Web Title: Wife's help to understand the terrorists Well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.