लग्नानंतर पतीच्या धर्मानुसार महिलेच्या धर्मात बदल होत नाही - सुप्रीम कोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2017 08:44 AM2017-12-08T08:44:03+5:302017-12-08T11:44:20+5:30

लग्नानंतर पतीच्या धर्मानुसार महिलेचा धर्म बदलत नाही, असे सुप्रीम कोर्टानं एका महत्त्वपूर्ण सुनावणीदरम्यान म्हटले आहे.

wifes religion does not merge with husbands after marriage sc | लग्नानंतर पतीच्या धर्मानुसार महिलेच्या धर्मात बदल होत नाही - सुप्रीम कोर्ट

लग्नानंतर पतीच्या धर्मानुसार महिलेच्या धर्मात बदल होत नाही - सुप्रीम कोर्ट

Next

नवी दिल्ली - लग्नानंतर पतीच्या धर्मानुसार महिलेचा धर्म बदलत नाही, असे सुप्रीम कोर्टानं एका महत्त्वपूर्ण सुनावणीदरम्यान म्हटले आहे. शिवाय, सुप्रीम कोर्टानं मुंबई हायकोर्टाच्या निर्णयावर असहमतीदेखील व्यक्त केली आहे. लग्नानंतर संबंधित महिला तिच्या पतीच्या धर्माची होते, असे हायकोर्टानं म्हटले होत. मात्र, हायकोर्टाच्या या निर्णयावर सुप्रीम कोर्टानं असहमती दर्शवली आहे. 

काय आहे नेमके प्रकरण ?
लग्नानंतर पतीचा धर्म असेल तोच त्याच्या पत्नीचाही होतो, असा निकाल मुंबई हायकोर्टानं दिला होता. हायकोर्टाच्या या निर्णयावर सुप्रीम कोर्टानं असहमती दर्शवली आहे. पारसी समुदायात एका महिलेनं दुस-या धर्मातील व्यक्तीसोबत लग्न केले. यामुळे संबंधित महिलेला तिच्या पालकांच्या अंत्यसंस्कार विधित सहभागी होण्यापासून रोखण्यात आले होते. गुलरोख एम. गुप्ता असे या महिलेचं नाव आहे. गुलरोखला 'टॉवर ऑफ सायलेन्स'पर्यंत जाण्याची परवानगी दिली गेली नाही. टॉवर ऑफ सायलेन्स म्हणजे जेथे पार्थिव अंतिम काही क्षणांकरिता ठेवण्यात येते.  या महिलेनं दुस-या धर्मातील व्यक्तीसोबत लग्न केल्यानं जोरोऑस्ट्रियन ट्रस्टनं तिला टॉवर ऑफ सायलेन्सपर्यंत जाण्यापासून रोखले होते. 

दरम्यान, संबंधित महिलेला 'टॉवर ऑफ सायलेन्स'मध्ये जाण्यास परवानगी न देणारा निर्णय 'वलसाड जोरोऑस्ट्रियन ट्रस्ट'ने मागे घ्यावा, असे आदेशही दिले आहेत. लग्न झाले म्हणून कोणत्याही महिलेला तिच्या मानवी हक्कांपासून वंचित ठेवता येणार नाही, असेही कोर्टाने स्पष्ट केले. त्याविरोधात त्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र, कोर्टाने ट्रस्टच्या बाजूने निकाल दिला. हायकोर्टाच्या निकालाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले. यावेळी सुप्रीम कोर्टानं हायकोर्टाच्या निर्णयावर असहमती दर्शवली. 

सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. ए. के. सीकरी, ए. एम. खानविलकर, डी. वाय. चंद्रचूड आणि अशोक भूषण यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. दुसऱ्या धर्माच्या मुलीशी लग्न करणाऱ्या पारसी पुरुषाला पालकांच्या अंत्यविधीत सहभागी होण्यापासून रोखले जात नाही, मग महिलेला अशी वागणूक का, असा सवाल खंडपीठाने केला. महिलेला 'टॉवर ऑफ सायलेंस'मध्ये जाण्यापासून रोखणारा असा कोणताच कायदा अस्तित्वात नाही. महिला तिच्या पतीचा धर्म स्वतःहून स्वीकारत नाही, तोपर्यंत पतीच्या धर्मानुसार महिलेचा धर्म बदलू शकत नाही, असेदेखील कोर्टानं स्पष्ट केले. 

Web Title: wifes religion does not merge with husbands after marriage sc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.