व्हॉट्सअॅपबाबत विकिलिक्सचा खळबळजनक खुलासा
By admin | Published: March 8, 2017 05:13 PM2017-03-08T17:13:01+5:302017-03-08T17:13:01+5:30
नागरिकांचे व्हॉटसअॅप अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा हॅक करते, विकिलिक्सचा खळबळजनक खुलासा
Next
>
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 8 - नागरिकांचे व्हॉटसअॅप मेसेज अमेरिकेची सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी (CIA) हॅक करत असल्याचा खळबळजनक खुलासा विकिलिक्सने केला आहे. विकिलिक्सच्या या खुलाशामुळे खळबळ उडाली आहे. यामुळे सीआयए अमेरिकन नागरिकांच्या खासगी जीवनात ढवळाढवळ करत असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. गोपनीय कागदपत्रे आणि संवेदनशील माहिती उघड करण्यासाठी विकिलीक्स ही वेबसाइट ओळखली जाते.
एका सॉफ्टवेअरच्या आधारे अँड्रॉइड आणि आयओएस स्मार्टफोनमधील माहिती सीआयए चोरत असल्याचा खुलासा विकिलिक्सने केला आहे. यासंदर्भात त्यांनी काही कागदपत्रेही प्रसिद्ध केली आहेत. या सॉफ्टवेअरच्या आधारे इंटरनेटला जोडलेल्या कोणत्याही डिव्हाइसची माहिती सीआयएला मिळते असं विकिलीक्सने म्हटलं आहे.
यापुर्वीही विकिलिक्सने अमेरिकी सरकारच्या गोपनीय माहितीचा खुलासा केला होता. त्यानंतर चांगलीच खळबळ उडाली होती. एकामागोमाग एक उघड केल्या जाणाऱ्या गोपनीय माहितीमुळे अमेरिकेचे धाबे दणाणले होते त्यामुळे या संकेतस्थळाविरोधात अमेरिकेने कारवाई करण्याचाही विचार केला होता. ‘विकिलिक्स’चे संस्थापक व संपादक ज्युलियन एसॅनेज यांच्यावर हेरगिरीचा गुन्हा दाखल करण्याचाही अमेरिकेचा विचार सुरू होता.