एअर इंडियाचं होणार खासगीकरण? सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2019 05:51 PM2019-08-29T17:51:00+5:302019-08-29T18:23:43+5:30

एअर इंडिया कंपनी चालवण्याची  केंद्र सरकारची इच्छा नसल्याने एअर इंडियाचं खासगीकरण करण्याचा विचार सरकार करत असल्याचे समोर आले आहे.

Will Air India be privatized? The government is preparing to make a big decision | एअर इंडियाचं होणार खासगीकरण? सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

एअर इंडियाचं होणार खासगीकरण? सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Next

नवी दिल्ली: एअर इंडिया कंपनी चालवण्याची  केंद्र सरकारची इच्छा नसल्याने एअर इंडियाचं खासगीकरण करण्याचा विचार सरकार करत असल्याचे समोर आले आहे.

नागरी उड्डाण मंत्री हरदीप पुरी यांनी सांगितले की, गृहमंत्री अमित शहा एअर इंडियाच्या खासगीकरणीसाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष असून एअर इंडियाचे खासगीकरण करण्याची प्रक्रिया लवकरच सुरु करण्यात येईल. तसेच याआधीही यासंबंधी कॅबिनेट सचिवांच्या अध्यतक्षतेखाली बैठक झाल्याचे त्यांनी सांगितले. 

गेल्या बऱ्याच काळापासून एअर इंडियाला आर्थिक अडचणींचा सामना करवा लागतोय. तसेच गेल्या काही दिवसांपासून सरकारी ऑइल मार्केटिंग कंपनीचे बिल न भरल्यामुळे HPCL, BPCL आणि IOCने एअर इंडियाला इंधनाचा पुरवठा देखील थांबवण्यात आला होता. त्याचप्रमाणे एअर इंडियातील कर्मचाऱ्यांच्या  एक महिन्याच्या पगारासाठी 300 कोटी खर्च करावा लागतो. तसेच 2017- 18 मध्ये एअर इंडियावर एकुण 55,000 कोटींचे कर्ज होते,  2018- 19 मध्ये त्या कर्जात वाढ होऊन  58,351.93 कोटी रुपये झाले आहे.

Web Title: Will Air India be privatized? The government is preparing to make a big decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.