Corona Vaccine Booster Dose: सर्व खासगी कर्मचाऱ्यांना बुस्टर डोस मिळणार? किरण मझुमदारांनी केली पंतप्रधानांकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 10:18 AM2022-01-17T10:18:57+5:302022-01-17T10:26:54+5:30
Corona Vaccine Booster Dose: रविवारीच देशात कोरोना लसीकरण मोहिमेला एक वर्ष पूर्ण झाले. आतापर्यंत देशातील १५६ कोटींहून अधिक लोकांना कोरोना लसीचा डोस मिळाला आहे. त्यापैकी 76 कोटींहून अधिक महिलांचे लसीकरण करण्यात आले आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये प्रसिद्ध उद्योजिका आणि बायोकॉनच्या प्रमुख किरण मझुमदारांनी रविवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मोठी मागणी केली आहे. रात्री ट्विट करत खासगी कंपन्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांना कोरोना लसीचा बुस्टर डोस देण्यासाठी परवानगी देण्याची मागणी केली आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत कंपन्यांचे कर्मचारी देखील कोरोनाबाधित सापडत आहेत. यामुळे कंपन्यांच्या कामात बाधा निर्माण होत आहे. उद्योगधंदे सुरु ठेवणे अर्थव्यवस्थेसाठी आवश्यक आहे, असे किरण मझुमदार म्हणाल्या. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधान कार्यालय आणि फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीला देखील टॅग केले आहे.
१० जानेवारीपासून भारतात फ्रंट लाईन वर्कर्स, आरोग्य कर्मचारी आणि ६० वर्षांवरील व्यक्तींना बुस्टर डोस देण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्य़ंत ४० लाख लोकांना ही लस मिळाली आहे. किरण मझुमदार-शॉ या बायोफार्मास्युटिकल्स कंपनी बायोकॉन लिमिटेडच्या कार्यकारी अध्यक्षा आणि संस्थापक आहेत. त्यांना पद्मश्री आणि पद्म भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
रविवारीच देशात कोरोना लसीकरण मोहिमेला एक वर्ष पूर्ण झाले. आतापर्यंत देशातील १५६ कोटींहून अधिक लोकांना कोरोना लसीचा डोस मिळाला आहे. त्यापैकी 76 कोटींहून अधिक महिलांचे लसीकरण करण्यात आले आहे. याशिवाय, 65 कोटींहून अधिक लाभार्थींचे संपूर्ण लसीकरण झाले आहे. ग्रामीण भागातील कोविड लसीकरण केंद्रांमध्ये ९९ कोटी डोस देण्यात आले. याशिवाय 3 लाख 69 हजारांहून अधिक लसीचे डोस ट्रान्सजेंडर्सना देण्यात आले.
With surging Positive cases I think all companies must be permitted to provide booster doses to its employees. There is massive work disruptions becos of folk testing positive. Keeping Industry moving is an essential need for the economy. @PMOIndia@FollowCII@ficci_india
— Kiran Mazumdar-Shaw (@kiranshaw) January 16, 2022
रविवारीच देशात कोरोना लसीकरण मोहिमेला एक वर्ष पूर्ण झाले. आतापर्यंत देशातील १५६ कोटींहून अधिक लोकांना कोरोना लसीचा डोस मिळाला आहे. त्यापैकी 76 कोटींहून अधिक महिलांचे लसीकरण करण्यात आले आहे. याशिवाय, अशा 65 कोटींहून अधिक लाभार्थींचे संपूर्ण लसीकरण झाले आहे. ग्रामीण भागातील कोविड लसीकरण केंद्रांमध्ये ९९ कोटी डोस देण्यात आले. याशिवाय 3 लाख 69 हजारांहून अधिक लसीचे डोस ट्रान्सजेंडर्सना देण्यात आले.