...हीच भगवान रामाची खरी पूजा ठरेल; राम मंदिर भूमिपूजनावर अरविंद केजरीवाल बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2020 02:15 PM2020-07-30T14:15:46+5:302020-07-30T14:56:51+5:30
राम मंदिराच्या भूमिपूजनावरून राजकारणाला तोंड फुटले असून, राजकीय क्षेत्रातून राम मंदिराच्या बांधणीबाबत विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही आता या वादात उडी घेत राम मंदिराच्या भूमिपूजनाबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
नवी दिल्ली - अयोध्येमधील रामजन्मभूमीमध्ये राम मंदिर बांधण्याचा मार्ग मोकळा झाल्यानंतर आता मंदिराच्या बांधकामाची पायाभरणीची तारीखही निश्चित झाली आहे. मात्र या विषयावरून राजकारणाला तोंड फुटले असून, राजकीय क्षेत्रातून राम मंदिराच्या बांधणीबाबत विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही आता या वादात उडी घेत राम मंदिराच्या भूमिपूजनाबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
लोकमतला दिलेल्या सविस्तर मुलाखतीमध्ये केजरीवाल यांनी कोरोनाच्या संकटासोबत देशातील विविध प्रश्नांवर भाष्य केले. त्यावेळी राम मंदिराच्या भूमिपूजनाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केजरीवाल म्हणाले की, ''कोरोनामुळे देशाची स्थिती अत्यंत वाईट होऊ शकते. प्रभु रामचंद्राचा आशीर्वाद आमच्यासोबत असल्याचे मी मानतो. त्यामुळेच आम्ही सर्व मिळून कोरोनासोबत लढत आहोत. आमच्या डॉक्टरांकडे रुग्णांचा प्राण वाचविण्यासाठी अत्यावश्यक सर्व सुविधा देण्याची ही वेळ आहे. देशातल्या गरीबांचा जीव वाचविणे, जो घाबरलेला आहे त्यांच्या मनातील भीती घालवणे, त्यांना मदत करणे, शिक्षण देणे, आरोग्य सेवा पुरविणे हीच भगवान रामाची खरी पूजा ठरू शकते,''
यावेळी चीनसोबत निर्माण झालेल्या तणावावरही केजरीवाल यांनी भाष्य केले. ''भारत आणि चीन यांच्यातील संबंध सुधारणे हे हे तेव्हाच शक्य आहे, जेव्हा मैत्री समसमान असेल. आम्ही अनेकदा अनुभवले, मग १९६२ असो की २०२०. भारताने मैत्रीचा हात पुढे केला. मात्र, त्यांनी आपल्या पाठीत खंजीर खुपसला. त्याचे कारणही आहे, आम्ही आज चीनवर निर्भर आहोत. त्यांची घुसघोरी आपण संधी म्हणून घ्यावी. चीनमधून लहानसहान वस्तु आयात केल्या जात होत्या. लक्ष्मी आणि गणेशमूर्ती चीनहून येतात. चीनहून आयात होणाऱ्या सर्व वस्तूंची यादी केंद्र सरकारने तयार करावी. वस्तुनुरूप भारतात निर्मिती वाढवावी. उद्योजकांना यासाठी मदत करावी. चीनच्या वस्तूंची आयात थांबवावी. यामुळे जीडीपी वाढेल, रोजगार निर्मिती होईल आणि अर्थव्यवस्था सुधारेल.''असे ते म्हणाले.
इतर महत्त्वाच्या बातम्या
टाइम कॅप्सुल म्हणजे नेमकं काय? जमिनीत पुरून ठेवण्यामागे असतो हा उद्देश
पंधरा गोळ्या झेलूनही हा वीर जवान लढला, अन् टायगर हिलवर तिरंगा फडकला
अमेरिकेला मिळाली कोरोनावरील लस, खरेदी केले १० कोटी डोस
घरी राहिल्यानेही कमी होत नाही कोरोनाच्या संसर्गाचा धोका, संशोधकांचा धक्कादायक खुलासा
कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी
coronavirus: धक्कादायक! कोरोनाच्या रिपोर्टमध्ये केले गोलमाल, डॉक्टर झाला मालामाल