भाजपला फेब्रुवारीअखेर मिळणार नवे अध्यक्ष? प्रदेशाध्यक्ष निवडीनंतर सुरू होणार प्रक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 11:51 IST2024-12-18T11:50:36+5:302024-12-18T11:51:13+5:30
केंद्रीय मंत्री जगतप्रकाश नड्डा या पक्षाचे विद्यमान अध्यक्ष आहेत. त्यांना यापूर्वी मुदतवाढ मिळालेली आहे.

भाजपला फेब्रुवारीअखेर मिळणार नवे अध्यक्ष? प्रदेशाध्यक्ष निवडीनंतर सुरू होणार प्रक्रिया
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड येत्या फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस होण्याची शक्यता आहे. ही माहिती भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने दिली. केंद्रीय मंत्री जगतप्रकाश नड्डा या पक्षाचे विद्यमान अध्यक्ष आहेत. त्यांना यापूर्वी मुदतवाढ मिळालेली आहे.
भाजपच्या वरिष्ठ नेत्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर मंगळवारी सांगितले की, येत्या जानेवारी महिन्याच्या मध्यापर्यंत देशातील निम्म्याहून अधिक राज्यांत भाजपच्या संघटनात्मक निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण झालेली असेल. देशातील राज्यांपैकी ६० टक्के प्रदेशाध्यक्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. नव्या प्रदेशाध्यक्षांची निवड करण्याचा निर्णय येत्या जानेवारीच्या मध्यापर्यंत हाेईल. त्यानंतर अध्यक्ष निवडीच्या हालचाली सुरू होणार आहेत.