चंपाई सोरेन यांची JMM मध्ये घरवापसी होणार? 'कोल्हन टायगर'ला हेमंत सोरेन यांची ऑफर..?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2024 08:08 PM2024-11-29T20:08:18+5:302024-11-29T20:09:00+5:30

झारखंड निवडणुकीतील पराभवानंतर भाजपात गेलेले चंपाई सोरेन परत झामुओमध्ये जाऊ शकतात.

Will Champai Soren return to JMM? Hemant Soren's offer to Kolhan Tiger... | चंपाई सोरेन यांची JMM मध्ये घरवापसी होणार? 'कोल्हन टायगर'ला हेमंत सोरेन यांची ऑफर..?

चंपाई सोरेन यांची JMM मध्ये घरवापसी होणार? 'कोल्हन टायगर'ला हेमंत सोरेन यांची ऑफर..?

Jharakhand News : झारखंडमध्ये सत्तेत परतल्यानंतर हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वातील झारखंड मुक्ती मोर्चा (JMM) भारतीय जनता पक्षाला (BJP) फोडण्याच्या तयारीत आहेत. जेएमएम निवडणुकीपूर्वी पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांना परत आणण्याचा प्रयत्न करत असून, या यादीत राज्यातील दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांचे नाव आघाडीवर आहे.

चंपाई सोरेन यांनी निवडणुकीपूर्वी JMM सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. हेमंत सोरेन आता ममता बॅनर्जींप्रमाणे आपल्या सर्व ज्येष्ठ नेत्यांना परत पक्षात आणण्याची योजना आखत आहेत. 2021 मध्ये बंगालमध्ये विजय मिळवल्यानंतर ममता बॅनर्जी यांनीदेखील टीएमसीमधून भाजपमध्ये गेलेल्या अनेक बड्या नेत्यांना परत आणले होते.

चंपाई सोरेन यांच्या नावाची चर्चा का?
चंपाई सोरेन सध्या सेराइकलन विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. चंपाई झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि JMM च्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत. यावेळी आदिवासींसाठी राखीव असलेल्या 28 पैकी केवळ एका जागेवर JMM आघाडीला पराभवाला सामोरे जावे लागले आहे आणि ती जागा चंपाई सोरेन यांची सरायकेला आहे. भाजपने ज्या आदिवासी जागा मिळवण्यासाठी चंपाई सोरेन यांना पक्षात घेतले होते, त्या सर्व जागांवर पक्षाचा पराभव झाला आहे.

दरम्यान, आता झारखंड निवडणुकीनंतर जेएमएमचे राष्ट्रीय सरचिटणीस सुप्रियो भट्टाचार्य यांनी चंपाई सोरेन यांच्या पुनरागमनाबाबत वक्तव्य केले आहे. सुप्रियो म्हणाले की, चंपाई दादांना पक्षात परत यायचे असेल, तर आम्ही त्यांचे स्वागत करू. त्यांच्यासाठी झामुमोचे दरवाजे नेहमी खुले असतील.

निवडणुकीदरम्यान एकमेकांवर टीका नाही
निवडणुकीच्या प्रचारात हेमंत सोरेन आणि चंपाई सोरेने यांनी एकमेकांवर एकदाही टीका केली नाही. इतकंच काय, तर शुक्रवारी बिरसा मुंडा यांच्या पणतूचा रांचीच्या रिम्स हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. रस्ते अपघातात जखमी झाल्यानंतर त्यांना येथे दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी रुग्णालयाने निष्काळजीपणा केल्याचा आरोप भाजपने केला आहे. याप्रकरणावरुन बाबू लाल मरांडीपासून ते अर्जुन मुंडापर्यंत...अनेकांनी सरकारला कोंडीत पकडले आहे. पण, चंपाई सोरने यांनी एकही शब्द काढला नाही.

झारखंडच्या राजकीय वर्तुळात चंपाईबाबत दोन चर्चा सुरू 
1. झारखंड मुक्ती मोर्चा चंपाई सोरेन यांना राज्यसभेवर पाठवू शकते आणि पराभूत झालेल्या त्यांच्या मुलाला सरायकेलनमधून आमदार बनवू शकते. 
2. पूर्वीप्रमाणेच चंपाई सोरने JMM मध्ये सामील होऊन हेमंत सोरेन यांच्या सरकारमध्ये मंत्री बनू शकतात.

Web Title: Will Champai Soren return to JMM? Hemant Soren's offer to Kolhan Tiger...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.