"...तर जीभ कापून टाकू"; तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचा भाजपा नेत्यांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2021 04:47 PM2021-11-08T16:47:37+5:302021-11-08T16:51:28+5:30

Telangana CM K. Chandrashekar Rao And BJP : केसीआर यांनी केंद्र सरकारने हे स्पष्ट केले आहे की ते धान्य खरेदी करणार नाही आणि कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दुसरे पीक निवडण्यास सांगितले आहे असं म्हटलं आहे.

will cut your tongues telangana cm K. Chandrashekar Rao warned bjp leaders | "...तर जीभ कापून टाकू"; तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचा भाजपा नेत्यांना इशारा

"...तर जीभ कापून टाकू"; तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचा भाजपा नेत्यांना इशारा

googlenewsNext

नवी दिल्ली - तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे. "जीभ कापून टाकू" असं म्हणत थेट भाजपा नेत्यांना इशारा दिला आहे. तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बंदी संजय कुमार यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच राज्यातील शेतकऱ्यांकडून धान्य खरेदी करण्याचे आश्वासन फसवे असल्याचं म्हटलं. याच दरम्यान मुख्यमंत्र्यांनी भाजपा नेत्यांना आमच्याबद्दल अनावश्यक गोष्टी बोलणं टाळा नाहीतर जीभ कापून टाकू असा इशाराही दिला. केसीआर यांनी केंद्र सरकारने हे स्पष्ट केले आहे की ते धान्य खरेदी करणार नाही आणि कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दुसरे पीक निवडण्यास सांगितले आहे असं म्हटलं आहे.

"मी थेट संबंधित केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतली आणि त्यांना खरेदी केलेला तांदूळ घेण्यास सांगितले. ते म्हणाले की मी निर्णय घेईन आणि सांगेन. पण आजपर्यंत मला कोणतेही उत्तर मिळाले नाही. तेलंगणा राज्यात गेल्या वर्षीपासून आतापर्यंत सुमारे पाच लाख टन धान्य पडून आहे. केंद्र ते विकत घेत नाही" असं के चंद्रशेखर राव यांनी म्हटलं आहे. भाजपा प्रदेशाध्यक्षांवर आक्रमक भूमिका घेत केसीआर यांनी "केंद्र म्हणत आहे की ते धान्य खरेदी करणार नाही आणि राज्यात भाजपा म्हणत आहे की ते खरेदी करेल."

"शेतकऱ्यांना वाचवण्याची जबाबदारी आपली"

"तुम्ही आमच्याबद्दल उद्धटपणे बोललात तर आम्ही तुमच्या (राज्यातील भाजपा नेत्यांच्या) जीभ कापून टाकू" असं म्हटलं आहे. "संजय म्हणाले होते की ते मला तुरुंगात पाठवणार आहेत. मी त्यांना मला स्पर्श करण्याचे आव्हान देतो. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून भाजपावर टीका करताना केसीआर म्हणाले की, आम्ही केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांसोबत आहोत. "शेती कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना आम्ही पाठिंबा देऊ. शेतकऱ्यांना वाचवण्याची जबाबदारी आपली आहे."

"राजकारण करुन शेतकर्‍यांच्या भावनांशी खेळताहेत"

"विरोधक राजकारण करुन शेतकर्‍यांच्या भावनांशी खेळत आहेत. तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस) शेतकर्‍यांच्या हक्कासाठी केंद्राविरोधात आंदोलन करणार आहे" असंही के चंद्रशेखर राव यांनी म्हटलं आहे. केसीआर यांनी केंद्र सरकारला पेट्रोल आणि डिझेलवरील उपकर मागे घेण्यासही सांगितले. "केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलच्या दराबाबत खोटे बोलत आहे. 2014 मध्ये कच्च्या तेलाची किंमत 105 डॉलर होती ती आता 83 डॉलरवर आली आहे. परदेशात पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढत असल्याचे भाजपा जनतेसोबच खोटे बोलत आहे" असं देखील चंद्रशेखर राव यांनी म्हटलं आहे.


 

Web Title: will cut your tongues telangana cm K. Chandrashekar Rao warned bjp leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.