देशविरोधी कारवायांना कठोरपणे हाताळणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2023 05:38 AM2023-03-13T05:38:44+5:302023-03-13T05:39:12+5:30
देशाच्या कोणत्याही भागात फुटीरतावाद, दहशतवाद व देशविरोधी कारवाया झाल्यास त्या कठोरपणे हाताळल्या जातील, असे अमित शाह यांनी सांगितले.
हैदराबाद : देशाच्या कोणत्याही भागात फुटीरतावाद, दहशतवाद व देशविरोधी कारवाया झाल्यास त्या कठोरपणे हाताळल्या जातील, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी येथे सांगितले. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) ५४ व्या स्थापना दिन सोहळ्यात ते बोलत होते.
सीआयएसएफ जवानांच्या सेवेचे कौतुक करताना ते म्हणाले की, विमानतळ, बंदरे व उद्योगधंदे सुरक्षित असतील तरच कोणताही देश प्रगती करू शकतो. भविष्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठी सीआयएसएफला आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज करण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालय कोणतीही कसर सोडणार नाही, असेही ते म्हणाले.
सीआयएसएफने स्वीकारले हायब्रीड मॉडेल
खासगी सुरक्षा एजन्सींना प्रशिक्षण देण्यासाठी सीआयएसएफने स्वीकारलेल्या हायब्रीड मॉडेलवर बाेलताना शाह म्हणाले की, सीआयएसएफची भूमिका वाढेल कारण हे दल खासगी कंपन्यांना सल्लागार म्हणून काम करू शकेल. सीआयएसएफने प्रथमच आपला वार्षिक स्थापना दिवस दिल्ली-एनसीआर बाहेर साजरा केला. तत्पूर्वी, त्यांनी मानवंदना स्वीकारली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"