एक्झिट पोल किती खोटे, किती खरे...भूतकाळात काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2018 10:04 PM2018-05-12T22:04:16+5:302018-05-12T22:04:16+5:30

विविध एक्झिट पोल सर्व वृत्तवाहिन्यांनी दिले आहेत.

Will Exit Polls Get it Right In Karnataka? A Look at Their Track Record | एक्झिट पोल किती खोटे, किती खरे...भूतकाळात काय घडलं?

एक्झिट पोल किती खोटे, किती खरे...भूतकाळात काय घडलं?

Next

नवी दिल्ली- कर्नाटक विधानसभेसाठी आज मतदान पार पडलं. एकुण 70 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली. कर्नाटक विधानसभेवर नेमकी कोण सत्ता स्थापन करणार? याबद्दलचा अंदाज देणारे विविध एक्झिट पोल सर्व वृत्तवाहिन्यांनी दिले आहेत. भाजपा-काँग्रेस या दोन पक्षांपैकी कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नसल्याचं या एक्झिट पोलमधून समोर आलं आहे. 
पण वृत्तवाहिन्यांनी व वृत्तसंस्थांनी जाहीर केलेले एक्झिट पोल किती खरे ठरणार ? याबद्दलही आता चर्चा आहे. एक्झिट पोलमधून समोर आलेले आकडे अनेकदा खोटे ही ठरतात. तसं चित्र याआधी पाहायला मिळालं आहे. एक्झिट पोल किती खोटे, किती खरे.. भूतकाळात नेमकं काय घडलं होतं? हे जाणून घेण्यासाठी चार मोठ्या राज्यांच्या म्हणजेच गुजरात, पंजाब, उत्तर प्रदेश व बिहार निवडणुकीनंतर समोर आलेल्या एक्झिट पोलवर एक नजर टाकूया. 

गुजरात 2018
मतदानानंतर विविध वृत्तवाहिन्या व वृत्त संस्थांनी भाजपाला गुजरात निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचं सांगतिलं होतं. पण मार्जिन नेमकं किती असेल याबद्दलची माहिती कुणालाही देता आली नाही. गुजरात निवडणुकीबद्दल टूडेज चाणक्यचा एक्झिट पोल पूर्णपणे चुकीचा ठरला. गुजरातमध्ये भाजपाला 135 जागा मिळतिल असं टूडेज चाणक्यने एक्झिट पोल सांगितला होता. टाइम्स नाउ व्हिएमआरच्या एक्झिट पोलनूसार भाजपाला 115 जागा मिळतील तर काँग्रेसला 65 जागा मिळण्याचा अंदाज होता. रिपब्लिक-सी वोटर्स आणि  न्यूज 18-सी वोटर्सनुसार भाजपाला 108 आणि काँग्रेसला 74 जागा मिळणार असं सांगितलं गेलं होतं. 
पण एक्झिट पोलचे हे नंबर काहीसे चुकीचे ठरले. गुजरातमध्ये भाजपाला 99 जागा मिळाल्या. 2012च्या निवडणुकीपेक्षा 16 जागा कमी मिळाल्या. पण गुजरातमध्ये सत्ता स्थापनेसाठी या जागा पुरेश्या होत्या. पण काँग्रेसने 2018मध्ये चांगली कामगिरी केली. 

पंजाब 2017
पंजाबमध्ये आम आदमी पार्टीचा दारूण पराभव होईल, असा अंदाज कुठल्याही एक्झिट पोलने वर्तविला नव्हता. पंजाबमध्ये आम आदमी पार्टी व काँग्रेसमध्ये काँटेकी टक्कर होईल, असं विविध एक्झिट पोलने सांगितलं. पण हे सर्व अंदाज खोटे ठरले. इंडिया टीव्ही-सी वोटरच्या एक्झिट पोलनुसार 67 पैकी 59 जागा जिंकत आप सत्ता स्थापन करेल,असं सांगण्यात आलं. न्यूड 24-चाणक्य आणि न्यूज एक्स-एमआरसीच्या एक्झिट पोलनुसार आप व काँग्रेसला समान जागा मिळतील. द इंडिया टूडे-अॅक्सिस एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला 62-71 जागा देण्यात आल्या तर आपला 42-51 जागा देण्यात आल्या. एबीपी-सीएसडीसीच्या एक्झिट पोलमध्ये काँग्रेस मोठा पक्ष असल्याचा दावा होता. पण निकालानंतर एक्झिट पोलचे अंदाज खोटे ठरले. पंजाबमध्ये आपला फक्त 20 जागा मिळाल्या. 

उत्तर प्रदेश 2017
उत्तर प्रदेश निवडणुकीसंदर्भातील सगळे एक्झिट पोल भाजपाच्या बाजूचे होते. भाजपाचा विलक्षण विजय, काँग्रेस- सपाचं सपशेल अपयश कुणीही सांगितलं नाही. एबीपी-सीएसडीसी आणि इंडिया टीव्ही-सी वोटरने भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरणार असण्याचा दावा केला होता. न्यूज 24- इंडिया चाणक्यचा एक्झिट पोल काहीसा बरोबर ठरला. भाजपाचा मोठा विजय असेल अस या एक्झिट पोलने म्हटलं होतं. 267-303 जागा मिळतील असा अंदाज होता. समाजवादी पक्ष व काँग्रेसच्या युतीला 73-103 जागा मिळतील आणि बहुजन समाज पक्षाला 15-39 जागा मिळतील, असा अंदाज होता. निकालानंतर उत्तर प्रदेशात भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरलाय 403 जागांच्या विधानसभेत भाजपने 324 जागा आपल्या नावे केल्या. 

बिहार 2015
बिहार निवडणुकीचा निकाल सर्वांची उत्कंठा ताणणारा होता. एबीपी-नेन्सनच्या एक्झिट पोलने नितीश कुमार व लालू प्रसाद यादव यांच्या महायुतीला 130 जागा मिळतील तर भाजपाला 108 जागांवर समाधान मानावं लागेल, असा दावा केला होता. टाइम्स नाउ-सी वोटरने महायुतीला 122 जागा दिल्या होत्या तर भाजपाला 111 जागा मिळणार असल्याचा दावा केला होता. पण निकालानंतर एकही एक्झिट पोलचे आकडे निकालाच्या अगदी जवळचेही नसल्याचं सिद्ध झालं. बिहारमध्ये महायुतीचा 178 जागा मिळवत विजय झाला. 


 

Web Title: Will Exit Polls Get it Right In Karnataka? A Look at Their Track Record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.