जिओ वेलकम ऑफरची मुदत मार्च 2017पर्यंत वाढणार ?
By Admin | Updated: October 25, 2016 21:48 IST2016-10-25T21:23:45+5:302016-10-25T21:48:27+5:30
रिलायन्स जिओनं आपल्या ग्राहकांसाठी एक खूशखबर आणली आहे.

जिओ वेलकम ऑफरची मुदत मार्च 2017पर्यंत वाढणार ?
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 25 - रिलायन्स जिओनं आपल्या ग्राहकांसाठी एक खूशखबर आणली आहे. रिलायन्स जिओनं वेलकम ऑफरनुसार ग्राहकांना 4जी डेटा आणि मोफत कॉलची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आतापर्यंत रिलायन्स जिओची ऑफर 31 डिसेंबर 2016पर्यंत मर्यादित होती. मात्र आता ती मुदत मार्च 2017पर्यंत वाढवण्याचं रिलायन्स कम्युनिकेशनच्या विचाराधीन असल्याचं समोर आलं आहे.
जिओ स्ट्रेटजी प्लाइंग हेड यांच्या मते जिओच्या ग्राहकांना समाधानकारक सेवा उपलब्ध होत नाही, तोपर्यंत त्यांच्याकडून पैसे घेणं योग्य ठरणार नाही. तसेच कंपनीचे सल्लागार जिओ वेलकम ऑफर मार्च 2017पर्यंत वाढवण्याचा सल्ला देत आहेत. त्यानुसार जिओ वेलकम ऑफर 3 महिन्यांपर्यंत वाढवण्याची शक्यता आहे.
रिलायन्स जिओनं भारती एअरटेल, व्होडाफोन, आयडिया सारख्या टेलिकॉम ऑपरेटर्स कंपन्यांवर इंटरकनेक्शन सुविधा न देण्याचा आरोप केला होता. त्यानुसार टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी (ट्राय)नं या कंपन्यांवर दंड लावला होता. दरम्यान जिओला लाइफ टाइम फ्री कॉलिंग स्कीममध्ये ट्रायकडून हिरवा कंदील मिळाला आहे. 3 डिसेंबरपर्यंत जिओ सिम घेणा-यांना ही सेवा मोफत उपलब्ध आहे.