गुड न्यूज! यंदा चांगला पाऊस होणार; हवामान खात्याचा सुखद अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 01:28 PM2020-04-15T13:28:15+5:302020-04-15T13:51:38+5:30

यंदाच्या पावसाबद्दल हवामान खात्याचा पहिला अंदाज

will have normal monsoon this year predicts weather department kkg | गुड न्यूज! यंदा चांगला पाऊस होणार; हवामान खात्याचा सुखद अंदाज

गुड न्यूज! यंदा चांगला पाऊस होणार; हवामान खात्याचा सुखद अंदाज

Next

मुंबई: यंदा सरासरी इतका पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. ५ जून ते ३० सप्टेंबर दरम्यान ९६ ते १०४ टक्के पाऊस पडेल, अशी माहिती हवामान खात्यानं दिली आहे. शेतकऱ्यांसह सर्वांसाठीच ही आनंदाची बातमी आहे. यंदा निनोसह सर्वच घटक सामान्य राहणार असल्यानं सरासरी इतका पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. 

नैऋत्येकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे जून ते सप्टेंबर दरम्यान देशात सरासरी (९६ ते १०४ टक्के) पाऊस पडेल, अशी माहिती हवामान खात्यानं दिली. यंदाच्या पावसाबद्दल हवामान खात्यानं व्यक्त केलेला हा पहिला अंदाज आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी इतका पाऊस होईल. या कालावधीत अल निनोमुळे होणारा परिणाम सामान्य असेल. पावसाच्या चारही महिन्यांमध्ये हीच परिस्थिती कायम राहील. त्यामुळे पाऊस चांगला होईल, अशी माहिती हवामान खात्यानं दिली.




भारतीय हवामान खात्यासोबतच बहुतांश इतर संस्थांनीदेखील यंदा चांगला पाऊस होईल, असा अंदाज वर्तवला आहे. मात्र पावसाच्या दुसऱ्या टप्प्यात पॅसिफिक महासागरातील ला निनोचा प्रभाव कमी होईल, अशी शक्यता जगातल्या काही संस्थांनी वर्तवली असल्याची माहिती भारतीय हवामान खात्यानं दिली. समुद्राच्या पृष्ठभागावरील तापमानाचा भारतातल्या मान्सूनवर मोठा परिणाम होतो. त्यामुळे हिंदी आणि पॅसिफिक महासागराच्या पृष्ठभागावरील तापमानावर हवामान विभागानं लक्ष ठेवून असल्याचं हवामान खात्यानं सांगितलं.

Web Title: will have normal monsoon this year predicts weather department kkg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस