वेतन आयोगाची अंमलबजावणी लांबणार?
By admin | Published: June 26, 2016 02:16 AM2016-06-26T02:16:30+5:302016-06-26T02:16:30+5:30
सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी २ ते ३ महिने लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. भारताची आर्थिक परिस्थिती दडपणाखाली आहे.
Next
नवी दिल्ली - सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी २ ते ३ महिने लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
भारताची आर्थिक परिस्थिती दडपणाखाली आहे. सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी एक लाख कोटींची आवश्यकता आहे. ब्रिटनच्या निर्णयामुळे विदेशी गुंतवणूक काढली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजारात स्थिरस्थावर व्हायला अवधी लागेल. सध्या ‘वेट अॅण्ड वॉच’ हे धोरण स्वीकारण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. सरकार १ आॅगस्टपासून सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करणार असल्याचे यापूर्वी वृत्त होते.