भारताची लस देणार ओमायक्रॉनला टक्कर? सीरम कोवोव्हॅक्सच्या २०० कोटी डोसची निर्मिती करणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2021 08:00 AM2021-12-19T08:00:43+5:302021-12-19T08:04:31+5:30

ज्या देशांचे दरडोई उत्पन्न मध्यम स्वरूपाचे आहे त्यांना कोवोव्हॅक्सच्या किमान १०० कोटी मात्रा दिल्या जातील.

will India vaccinate against Omicron and Serum to produce 200 crore doses | भारताची लस देणार ओमायक्रॉनला टक्कर? सीरम कोवोव्हॅक्सच्या २०० कोटी डोसची निर्मिती करणार!

भारताची लस देणार ओमायक्रॉनला टक्कर? सीरम कोवोव्हॅक्सच्या २०० कोटी डोसची निर्मिती करणार!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क : कोरोनाच्या प्रकोपानंतर भारतात कोरोना प्रतिबंधक लस निर्मितीसाठी लगबग सुरू झाली. पुण्याची सीरम इन्स्टिट्यूट आणि हैदराबादची भारत बायोटेक यांनी अनुक्रमे कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसी बाजारात आणल्या आणि देशव्यापी लसीकरण मोहिमेला वेग मिळाला. त्यानंतर आणखी काही लसी देशात आल्या. 

आताही सीरम इन्स्टिट्यूटच्या एका लसीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी मिळाली आहे. या लसीची परिणामकारकता ९० टक्क्यांहून अधिक असून इतर लसीच्या तुलनेत अधिक चांगली लस असल्याचे बोलले जाते. ओमायक्रॉनची लक्षणं आधीच्या व्हेरिएंटपेक्षा वेगळी आहेत. जाणून घेऊया नव्या विषाणूची लक्षणे काय आणि त्याचा कितपत धोका आहे...?

नवीन कोणती लस आली?

- जागतिक आरोग्य संघटनेने कोवोव्हॅक्स या लसीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी दिली आहे.

- कोवोव्हॅक्स लसीचे उत्पादन पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटने केले आहे.

- कोवोव्हॅक्स हे सीरमच्या नोवाव्हॅक्स लसीचेच रुपांतर आहे.

- नोवाव्हॅक्स या अमेरिकी कंपनीने कोवोव्हॅक्स लसीच्या उत्पादनाचे कंत्राट सीरमला दिले आहे.

- कोवोव्हॅक्स लसीच्या २०० कोटी मात्रांची निर्मिती सीरम इन्स्टिट्यूट करणार आहे.

- ऑगस्ट महिन्यामध्ये कोवोव्हॅक्स उत्पादनासंदर्भात सीरमचा करार झाला होता.

- करारानुसार ज्या देशांचे दरडोई उत्पन्न मध्यम स्वरूपाचे आहे त्यांना कोवोव्हॅक्सच्या किमान १०० कोटी मात्रा दिल्या जातील.

देशात उपलब्ध असलेल्या लसी

- कोविशील्ड
- कोव्हॅक्सिन
- स्पुतनिक व्ही
- मॉडर्ना
- झायकोव्ह डी
- जॉन्सन अँड जॉन्सन
 

Web Title: will India vaccinate against Omicron and Serum to produce 200 crore doses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.