‘जयललितांचा मृतदेह बाहेर काढावा का?’
By admin | Published: December 30, 2016 05:02 AM2016-12-30T05:02:05+5:302016-12-30T05:02:05+5:30
तमिळनाडच्या माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या गूढ मृत्यूविषयी मद्रास उच्च न्यायालयाने गुरुवारी शंका व्यक्त केली आणि मृत्यू नेमका कसा झाला याचा सरकारने
चेन्नई : तमिळनाडच्या माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या गूढ मृत्यूविषयी मद्रास उच्च न्यायालयाने गुरुवारी शंका व्यक्त केली आणि मृत्यू नेमका कसा झाला याचा सरकारने समाधानकारक खुलासा न केल्यास जयललिता यांचे दफन केलेले पार्थिव उकरून बाहेर काढण्याचा आदेश दिला जाऊ शकेल, असे संकेत दिले.
अण्णाद्रमुकचे कार्यकर्ते पी. ए. स्टॅलिन यांनी केलेल्या जनहित याचिकेवर अल्प सुनावणी झाली, तेव्हा न्या. एस. वैद्यनाथन व न्या.व्ही. पर्तिबन यांच्या खंडपीठाने लोकांच्या मनात असलेल्या शंकांचे निरसन न केल्याबद्दल राज्य व केंद्र सरकारला धारेवर धरले. न्या. वैद्यनाथन म्हणाले की, जयललिता यांच्या मृत्यूविषयी माध्यमांमध्ये अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. व्यक्तिश: माझ्याही मनातही शंका आहेत.
जयललिता यांचा मृत्यू अजिबात संशयास्पद नाही, असे अॅडव्होकोट जनरल मुथुकुमारस्वामी म्हणाले, तेव्हा न्यायमूर्ती त्यांना म्हणाले की, तुम्ही काहीही सांगितले तरी लोकांचे समाधान व्हायला हवे.