आता ललित मोदींच्या प्रत्यार्पणालाही मिळणार गती?

By admin | Published: April 18, 2017 06:41 PM2017-04-18T18:41:54+5:302017-04-18T18:41:54+5:30

आता भारताला हवा असलेली अजून एका आरोपीचा प्रत्यार्पणामध्ये नंबर लागणार का याची चर्चा सुरू झाली

Will Lalit Modi's extradition be speeded up? | आता ललित मोदींच्या प्रत्यार्पणालाही मिळणार गती?

आता ललित मोदींच्या प्रत्यार्पणालाही मिळणार गती?

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 12 - बँकांचे हजारो कोटींचे कर्ज थकवून ब्रिटनमध्ये फरार झालेल्या विजय माल्याला अटकेनंतर तात्काळ जामीन मिळाला असला तरी माल्याच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू झाल्याचे मानले जात आहे. आता भारताला हवा असलेली अजून एका आरोपीचा प्रत्यार्पणामध्ये नंबर लागणार का याची चर्चा सुरू झाली आहे. तो आरोपी म्हणजे आयपीएलचा माजी आयुक्त आणि आर्थिक हेराफेरीप्रकरणी ईडीला हवा असलेला वादग्रस्त क्रिकेट प्रशासक ललित मोदी. 
 ललित मोदी यांनी आयपीएलच्या निधीचा गैरव्यवहार केल्याची तक्रार २०१० मध्ये बीसीसीआयने केली होती. मोदी यांच्याविरुद्ध मनी लॉड्रिंग अ‍ॅक्टअंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.  त्यानंतर मोदींची फेमा कायद्याखाली ईडीकडून चौकशीही सुरू झाली होती. त्यादरम्यान, ललित मोदी २०१० मध्ये देश सोडून इंग्लंडमध्ये आश्रयास गेला होता. तेव्हापासून मोदीच्या भारताकडे प्रत्यार्पणासाठी भारताकडून प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, इंडियन प्रीमियर लिगचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांच्याविरुद्ध बजावलेल्या अजामीनपात्र वॉरंटवर अंमलबजावणी करण्यासाठी ब्रिटिश सरकारला विनंतीपत्र पाठवण्याची परवानगी नोव्हेंबर महिन्यात विशेष न्यायालयाने सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) दिली होती.  

Web Title: Will Lalit Modi's extradition be speeded up?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.