मद्य सम्राट विजय मल्याचा पासपोर्ट होणार रद्द

By admin | Published: April 13, 2016 03:20 PM2016-04-13T15:20:23+5:302016-04-13T17:47:55+5:30

विजय मल्या यांना ३ वेळा समन्स बाजावूनही हजर न राहिल्यामुळे त्यांचा पासपोर्ट रद्द करण्याची मागणी प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयात सक्तवसुली संचालनालयाने केली आहे

Will Mallika's passport be canceled? | मद्य सम्राट विजय मल्याचा पासपोर्ट होणार रद्द

मद्य सम्राट विजय मल्याचा पासपोर्ट होणार रद्द

Next
>डिप्पी वाकंणी
नवी दिल्ली, दि. १३ - बंद पडलेल्या किंगफिशर एअरलाइन्सचे सर्वेसर्वा विजय मल्ल्या यांना आज अमलबजावणी संचालनालयाने दणका दिला आहे. विजय मल्या यांना ३ वेळा समन्स बाजावूनही हजर न राहिल्यामुळे त्यांचा पासपोर्ट रद्द करण्याची मागणी प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयात सक्तवसुली संचालनालयाने केली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी परराष्ट्र मंत्रालयायाला पासपोर्ट कायदा 1967 नुसार कारवाई करण्याची विनंती करुन प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाकडे मल्ल्यांचे राजनैतिक पारपत्र (डिप्लोमॅटिक पासपोर्ट) रद्द करण्याची मागणी केली आहे. 
 
ईडीच्या सुत्राने लोकमतला दिलेल्या माहितीनुसार ईडी विजय मल्याला भारतात परत आणण्यासाठी त्याच्यावर दबाव आणत आहोत, त्याचं बेकायदेशिर परदेशात असणारे वास्तव्य थोड्याच कालावधीत संपेल आणि तो भारतात परतेल. मद्यसम्राट विजय मल्या विरुद्ध न्यायालयाने अजामीनपत्र वारटं काढून पहिल पाऊल टाकले आहे.
 
मल्ल्या यांच्या किंगफिशर एअरलाईन्ससाठी स्टेट बँकेसह १७ बँकांनी कर्ज दिले होते. स्टेट बँक या सर्व बँकांचे नेतृत्व करत आहे. सर्व बँकांचे मिळून तब्बल 9 हजार करोड रुपये किंगफिशर एअरलाईन्सने थकवले आहेत. 2 मार्चला विजय मल्ल्या दुपारी 1.30 वाजता जेट एअरवेजच्या दिल्ली - लंडन ‘9W 122’ विमानाने रवाना झाले होते. विजय मल्ल्या यांना देश सोडून जाण्यास मनाई करणारा आदेश द्यावा याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात १७ सार्वजनिक बँकांच्या कन्सोर्टियमने याचिका केली होती मात्र विजय मल्ल्या अगोदरच देश सोडून रवाना झाल्याची माहिती ऍटर्नी जनरल यांनी न्यायालयात दिली होती.
 
सक्तवसुली संचालनालयाने मल्ल्यांविरोधात आर्थिक अफरातफरीचा गुन्हा दाखल केला आहे. बँकांकडून कर्ज म्हणून घेण्यात आलेला पैसा विदेशामध्ये धाडण्यात आला का या अंगाने सक्तवसुली संचालनालय चौकशी करण्याची शक्यता आहे. 
 
किंगफिशर एअरलाइन्स बंद पडल्यानंतर बँकांची हजारो कोटी रुपयांची कर्जे बुडाली असून बँकांबरोबर एकरकमी तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे मल्ल्या यांनी म्हटले होते. ही कर्जे माझी व्यक्तिगत नव्हती असा दावा मल्ल्या यांचा आहे. या कर्जांपोटी मला व्यक्तिगतरीत्या जबाबदार धरणे योग्य नसल्याचे सांगत हा माझ्या बदनामीचा कट असल्याचेही मल्ल्या यांनी म्हटले होते. 
 

Web Title: Will Mallika's passport be canceled?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.