मध्यमवर्गाला प्राप्तिकरात सवलत मिळणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 01:52 AM2019-09-26T01:52:15+5:302019-09-26T06:53:42+5:30
कॉपोर्रेट टॅक्समध्ये मोठी सवलत दिल्यानंतर मोदी सरकार आता व्यक्तिगत प्राप्तिकरातही दिलासा देण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू आहे.
नवी दिल्ली : कॉपोर्रेट टॅक्समध्ये मोठी सवलत दिल्यानंतर मोदी सरकार आता व्यक्तिगत प्राप्तिकरातही दिलासा देण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू आहे. याला सरकारमधील कोणीही दुजोरा दिला नसला तरी करांच्या टप्प्यांत बदल करण्याची तयारी सुरू असल्याचे समजते. प्रत्यक्ष कर कायद्यात सुचवलेल्या शिफारशींची अंमलबजावणी करताना करांच्या दरांमध्ये कपात केली जाण्याची शक्यता आहे.
लोकांना देण्यासाठी प्राप्तिकरात सवलतीची घोषणा वटहुकुमाद्वारे केली जाईल, असे वृत्त एका वेबसाइटने दिले आहे. असे घडल्यास नोकरदार-मध्यमवर्गाला मोठा फायदा होईल. मंदीमुळे ज्यांचे वेतन वाढलेले नाही त्यांनाही दिलासा मिळेल. कायद्यात बदलांबाबत केलेल्या शिफारशी पाहता ५ लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्यांना प्राप्तिकरातून पूर्ण सवलत तर ५ लाख ते १0 लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्यांना केवळ १0 टक्केच प्राप्तिकर आकारला जाण्याची शक्यता आहे.