मोदी ‘डिजिटल फूड’ वाढणार काय?
By admin | Published: September 28, 2015 11:40 PM2015-09-28T23:40:26+5:302015-09-28T23:40:26+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेतील भाषणात केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला हे आकडेवारीच्या तपशीलानिशी मैदानात उतरले आहेत.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेतील भाषणात केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला हे आकडेवारीच्या तपशीलानिशी मैदानात उतरले आहेत. गुगलवर फुडग्रेन्स(धान्य)टाईप करताच २६.५ कोटी टन धान्यसाठ्याचे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले जातील. फेसबुकवर डोलणारी पिके १२५ कोटी भारतीयांच्या ताटात डिजिटल फूड(अन्न) म्हणून वाढली जाणार, असे भासवत मोदी देशाच्या विकासाचे चित्र रंगवू लागले आहेत. एवढी समृद्धी आल्यानंतर कुटुंबप्रमुख नक्राश्रू ढाळत नसेल तरच कहाणी रोचक होणार नाही, असे सांगत सुर्जेवाला यांनी मोदींचे दावे फोल ठरविले आहेत.
पंतप्रधानांनी टिष्ट्वटर, फेसबुक, इंस्टाग्रामला नव्या शेजाऱ्याची उपमा दिली आहे. दुसरीकडे गुजरात आणि महाराष्ट्रात मीडिया आणि इंटरनेट टेलिफोनवर बंदी आणली जात आहे. मोदींनी वास्तव विसरत प्रीतीचे प्रदर्शन चालविले आहे. त्यांचा आवेश नव्याने गृहप्रवेश करण्यासारखा आहे. सोशल मीडिया,दूरसंचार आणि इंटरनेटची व्यापक क्रांती भारताने याआधीच आत्मसात केली आहे, तथापि मोदींनी हाच आधार घेत विकासाची नवी व्याख्या मांडली आहे. मोदींना भूतकाळात मातेने केलेल्या त्यागाचा अभिमान आहे, तथापि गेल्या १६ महिन्यांत त्यांनी ९० वर्षीय मातेची एकदाही भेट घेतलेली नाही. मोदींनी स्वत:चे ‘अच्छे दिन’असताना मातेला सोबत न ठेवणे अधिक पीडादायक ठरते. त्यांनी वास्तवाची भिंत ओलांडत आभासी दुनियेत प्रवेश केला आहे, असा टोलाही त्यांनी मारला. (प्रतिनिधी)