हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांना सोडणार नाही, त्यांना धडा शिकवणारच-मोदी
By admin | Published: September 18, 2016 06:38 PM2016-09-18T18:38:56+5:302016-09-18T18:41:00+5:30
जम्मू-काश्मिरच्या उरी येथील लष्करी मुख्यालयावरील दहशतवादी हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरद्वारे तीव्र निषेध
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली,दि.18- जम्मू-काश्मीरच्या उरी येथील लष्करी मुख्यालयावरील दहशतवादी हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरद्वारे तीव्र निषेध केला आहे. हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांना सोडणार नाही, त्यांना धडा शिकवणारच असा इशारा मोदींनी दिला.
हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांना शिक्षा दिल्याशिवाय सोडणार नाही. उरीतील भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्यांना मी वंदन करतो. देशासाठी त्यांचं बलीदान देश कधीच विसरणार नाही. संपूर्ण देश शहीदांच्या कुटुंबीयांसमवेत आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि संरक्षणमंत्र्यांशी चर्चा झाली आहे. तेथील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी संरक्षणमंत्री जम्मू काश्मीरला जाणार आहेत असेही मोदींनी नमूद केले.
We strongly condemn the cowardly terror attack in Uri. I assure the nation that those behind this despicable attack will not go unpunished.
— Narendra Modi (@narendramodi) September 18, 2016