...तशी चूक पुन्हा करणार नाही : गांगुली

By admin | Published: June 21, 2016 07:08 PM2016-06-21T19:08:06+5:302016-06-21T19:08:06+5:30

२००५ मध्ये ग्रेग चॅपेलच्या नावाची शिफारस करण्याची चूक केली होती, पुन्हा अशा प्रकारची चूक करणार नाही

... will not repeat the mistake: Ganguly | ...तशी चूक पुन्हा करणार नाही : गांगुली

...तशी चूक पुन्हा करणार नाही : गांगुली

Next

ऑनलाइन लोकमत

कोलकाता, दि. 21- सौरव गांगुली यांच्याकडे टीम इंडियाच्या नव्या प्रशिक्षकाची निवड करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. २००५ मध्ये ग्रेग चॅपेलच्या नावाची शिफारस करण्याची चूक केली होती, पुन्हा अशा प्रकारची चूक करणार नाही, असे गांगुलीने म्हटले आहे.
चॅपेल भारतीय संघाचे प्रशिक्षक झाल्यानंतर त्यांचे गांगुलीसोबत संबंध विशेष चांगले नव्हते. त्याच कालावधीत गांगुलीला राष्ट्रीय संघाच्या कर्णधारपदावरून हटविण्यात आले होते.
ए सेंच्युरी इट नॉट इनफ या त्याच्या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात बोलतान गांगुली म्हणाला, मला एकदा प्रशिक्षकाची निवड करण्याची संधी मिळाली होती. माझ्या मते मी २००५ मध्ये चॅपेल यांच्या नियुक्तीच्या वेळी चूक केली होती. मला पुन्हा संधी मिळाली आहे. मी एकदा मुलाखत (चॅपेल यांची) घेतली आहे आणि त्याचा निकाल चांगला नव्हता.
क्रिकेट सल्लागार समिती यावेळी योग्य व्यक्तीची निवड करेल, अशी गांगुलीला आशा आहे.
गांगुली म्हणाला, यावेळी योग्य व्यक्तीची प्रशिक्षकपदी निवड होईल, अशी आशा आहे. ती व्यक्ती कुणीही असू शकते. मला सचिन तेंडुलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण, बीबीसीआयचे सचिव अजय शिर्के आणि अध्यक्ष अनुराग ठाकूर यांचा पाठिंबा आहे, हे मी माझे सुदैव समजतो. आम्ही सर्वानुमते योग्य व्यक्तीची निवड करण्यात यशस्वी ठरू, असा विश्वास आहे.
गांगुली पुढे म्हणाला, प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास अडीच वर्षांपूर्वी मी स्वत: या पदाबाबत विचार करीत होतो आणि आज मी कुणा एकाची या पदासाठी निवड करणार आहे. जीवन असेच असते. मी मुलाखत दिली नाही, पण एक दिवस नक्की मुलाखत देईल. 
गांगुलीने सांगितले की, जीवनात काहीच निश्चित नसते. आगामी दोन वर्षांत काय घडेल हे कुणीच सांगू शकत नाही. मी बंगाल क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष होईल आणि विश्व टी-२० स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे यजमानपद भूषवेल, याचा कुणी विचार केला नव्हता. हे जीवन असून वाटचाल करावी लागते.
माजी कर्णधार गांगुली म्हणाला की, सोमवारी रात्री मला झोप आली नाही. कारण मंगळवारी मला प्रशिक्षकपदासाठी मुलाखत घ्यायची होती. हा अनुभव काही अंशी १९९६ मध्ये इंग्लंडविरुद्ध लॉडर्स्् मैदानावर कसोटी पदार्पणाच्या पूर्वी होता तसाच होता, असेही गांगुलीने सांगितले.
गांगुली म्हणाला, सोमवारी सर्व जण झोपत असताना मला मात्र झोप येत नव्हती. मी त्यावेळी लॉर्डस्वर झळकावलेल्या शतकाचा युट्यूबवर व्हिडीओ बघितला. हा १२ मिनिटांचा व्हिडीओ आहे. त्यानंतर मला झोप आली. मी साधारण व्यक्ती असून आपल्या व्यवसायात चांगले कार्य करण्यास इच्छुक आहे. त्या रात्री लॉर्डस्वर माझ्यातील आत्मविश्वास जागृत झाला. जर मी मेहनत केली तर पुढील १० वर्षे खेळू शकतो, असे मला वाटले.
लॉर्डस्वरच्या शतकानंतर झालेली पत्रकार परिषद माझ्या चांगल्या आठवणीत आहे. याबाबत बोलताना गांगुली म्हणाला,ह्यपहिला प्रश्न होता, तुम्ही तुमच्या टीकाकारांना गप्प केले, याबाबत काय सांगाल? त्यावेळी माझ्या डोक्यात एकच विचार आला की मी या लायकीचा आहे? 

Web Title: ... will not repeat the mistake: Ganguly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.