जिओची ग्राहकसंख्या येणार अर्ध्यावर?

By admin | Published: March 1, 2017 04:25 AM2017-03-01T04:25:28+5:302017-03-01T04:25:28+5:30

रिलायन्स जिओच्या ग्राहकांची संख्या ‘वेलकम’ आणि ‘हॅप्पी न्यू ईअर’ योजनांमुळे दहा कोटींच्या घरात गेली आहे.

Will the number of customers come in half? | जिओची ग्राहकसंख्या येणार अर्ध्यावर?

जिओची ग्राहकसंख्या येणार अर्ध्यावर?

Next


मुंबई / नवी दिल्ली / कोलकाता : रिलायन्स जिओच्या ग्राहकांची संख्या ‘वेलकम’ आणि ‘हॅप्पी न्यू ईअर’ योजनांमुळे दहा कोटींच्या घरात गेली आहे. पण, १ एप्रिलपासून कंपनी मासिक शुल्क आकारणार असल्याने या ग्राहकांची संख्या झपाट्याने कमी होऊ शकते, असा अंदाज यातील तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
रिलायन्स जिओच्या ग्राहकांना ‘जिओ प्राइम’अंतर्गत आता ९९ रुपये एकदाच भरावे लागणार आहेत. दर महिन्याला ३०३ रुपये शुल्क आकारले जाईल. याबाबत जिओच्या काही ग्राहकांशी संवाद साधला असता त्यांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतली असल्याचे दिसून आले. डेटाची स्पीड आणि गुणवत्ता पाहून निर्णय घेणार असल्याचे अनेक जणांनी सांगितले.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी सांगितले की, १ एप्रिलपासून ग्राहकांना शुल्क आकारण्यात येणार आहे. सध्याचे सदस्य आणि मार्चपर्यंत जे सदस्य होतील त्यांच्यासाठी काही प्रमाणात सूट देण्यात येणार आहे.
१ एप्रिल २०१७ पासून जिओ शुल्क आकारणार आहे. जिओचे सध्याचे सदस्य आणि ३१ मार्चपर्यंत दाखल होणारे ग्राहक यांना एकदाच ९९ रुपये भरून ‘जिओ प्राइम’ या योजनेत सहभागी होता येणार आहे. त्यानंतर दर महिन्याला ३०३ रुपये आकारले जातील. त्याबदल्यात १ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉल, मेसेज मिळणार आहेत.

Web Title: Will the number of customers come in half?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.