गौरी लंकेश हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे नको - कविता लंकेश

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2018 09:12 AM2018-12-28T09:12:16+5:302018-12-28T09:19:11+5:30

ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणाचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण खात्याकडे (सीबीआय) देऊ नये अशी मागणी कविता लंकेश यांनी केली आहे.

Will Oppose CBI Investigation Into Murder Case: Gauri Lankesh's Sister | गौरी लंकेश हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे नको - कविता लंकेश

गौरी लंकेश हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे नको - कविता लंकेश

Next
ठळक मुद्देज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणाचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण खात्याकडे (सीबीआय) देऊ नये अशी मागणी कविता लंकेश यांनी केली आहे.कर्नाटक पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासात प्रगती केली आहे. याप्रकरणी 16 जणांना अटक करण्यात आली आहे.'जर या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे देण्याची तयारी राज्य सरकारने दर्शविली तर आपण स्वत: या प्रकरणात पक्षकार होऊ आणि या निर्णयास सुप्रीम कोर्टात विरोध करू,' असा इशारा कविता लंकेश यांनी दिला आहे. 

बंगळुरू -  ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणाचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण खात्याकडे (सीबीआय) देऊ नये अशी मागणी कविता लंकेश यांनी केली आहे. कर्नाटक पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासात प्रगती केली आहे. याप्रकरणी 16 जणांना अटक करण्यात आली आहे. 'जर या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे देण्याची तयारी राज्य सरकारने दर्शविली तर आपण स्वत: या प्रकरणात पक्षकार होऊ आणि या निर्णयास सुप्रीम कोर्टात विरोध करू,' असा इशारा कविता लंकेश यांनी दिला आहे. 

गौरी लंकेश, एम.एम. कलबर्गी, गोविंद पानसरे आणि नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येत एकसूत्रता दिसत असल्याने हे प्रकरण तपासासाठी सीबीआयकडे देण्याचे सुप्रीम कोर्टाने  म्हटले आहे. मात्र आता कविता लंकेश यांनी याप्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवू नये ही मागणी केली आहे. याप्रकरणी 16 आरोपींना अटक झाली आहे. दोन आरोपपत्रे दाखल झाली आहेत. इतका तपास पुढे गेला असताना या टप्प्यावर प्रकरण सीबीआयकडे देण्यात काहीच अर्थ नाही,' असे कविता लंकेश यांनी म्हटले आहे. 

गौरी लंकेश ‘लंकेश पत्रिका’ या कन्नड साप्ताहिकाच्या संपादिका होत्या. कर्नाटकातील सांप्रदायिकता आणि उजव्या विचारसरणीविरोधात त्यांनी आवाज उठवला होता. गौरी लंकेश या दिवंगत साहित्यिक पी लंकेश यांच्या कन्या होत्या. 5 सप्टेंबर रोजी गौरी लंकेश यांची बंगळुरूमधील राहत्या घरी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. गौरी लंकेश आपली गाडी पार्क करुन घराच्या दिशेने जात असताना त्यांच्यावर सात गोळ्या झाडण्यात आल्या. गौरी लंकेश यांनी दरवाजाच्या दिशेने पळण्याचा प्रयत्न केला असता, तीन गोळ्या त्यांना लागल्या. त्यापैकी एक गोळी मानेवर, एक छातीवर, तर एक त्यांच्या कपाळावर लागली. तर चार गोळ्या घराच्या भिंतीवर लागल्या. 
 

Web Title: Will Oppose CBI Investigation Into Murder Case: Gauri Lankesh's Sister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.