घरच्या पत्त्यावर पासपोर्ट पाठवला जाईल का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 12:52 PM2018-03-27T12:52:43+5:302018-03-27T12:52:43+5:30
माझी व्हीसासाठी मुलाखत दोन आठवड्यांनी मुंबईत होणार आहे, मला माझा पासपोर्ट माझ्या घराच्या पत्त्यावर ( जे मुंबईबाहेर आहे) पाठवला जाईल का ?
प्रश्न- माझी व्हीसासाठी मुलाखत दोन आठवड्यांनी मुंबईत होणार आहे, मला माझा पासपोर्ट माझ्या घराच्या पत्त्यावर ( जे मुंबईबाहेर आहे) पाठवला जाईल का ?
उत्तर : हो तुम्हाला तुमचा पासपोर्ट घरच्या पत्त्यावर पाठवला जाईल. जेव्हा तुम्ही आमचा आँनलाइन व्हीसा अर्ज भरता तेव्हाच 'प्रिमियम डिलिव्हरी सर्विस' हा पर्याय निवडलात तर तुमच्या घरच्या पत्त्यावर किंवा आपण निर्देशित केलेल्या पत्त्यावर पासपोर्ट पाठवला जाईल.
पासपोर्ट घरच्या पत्त्यावर पाठवण्यासाठी कँश आँन डिलिव्हरी हा पर्याय आहे, त्यासाठी अर्जदात्यास ५०० रुपये मोजावे लागतील. ज्यावेळेस पासपोर्ट असणारे कुरिअर तुमच्याकडे येईल तेव्हा आपल्याला सरकारने अधिमान्यता दिलेले छायाचित्र असणारे ओळखपत्र दाखवावे लागेल. त्याचप्रमाणे पासपोर्ट आणि तुम्हाला पाठवलेली कागदपत्रे देण्यासाठी तुम्हाला स्वाक्षरीही करावी लागेल.
जर पासपोर्ट देणे कुरिअरला शक्य न झाल्यास ते तेथे साँरी कार्ड ठेवतील, या कार्डवर पासपोर्ट पाठवण्याचा प्रयत्न झाला हे सूचित करणारा रेफरन्स क्रमांक दिलेला असेल. हे कार्ड मिळाल्यावर आपण त्यावरील फोन नंबरवरुन तात्काळ कुरिअर कंपनीला फोन करणे अपेक्षित आहे.
आमच्या व्हीसा अर्ज केंद्रावर किंवा ब्लू डार्टच्या केंद्रावर पासपोर्ट घेण्याचा पर्यायही देण्यात आला आहे. त्यासाठी कोणतेही शुल्क नाही. अधिक माहितीसाठी आमच्या संकेतस्थळाला भेट द्या.