रुग्ण वाढणार की स्थिती नियंत्रणात येणार?; कोरोनाबाबत सर्वांचे दावे वेगवेगळे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2020 10:54 PM2020-07-19T22:54:43+5:302020-07-19T22:54:52+5:30

जुलैमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढेल किंवा त्याचा उच्चांक होईल, असे एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटले होते. त्यांचा दावा खरा ठरताना दिसत आहे.

Will the patient grow or will the condition come under control ?; Everyone has different claims about Corona | रुग्ण वाढणार की स्थिती नियंत्रणात येणार?; कोरोनाबाबत सर्वांचे दावे वेगवेगळे

रुग्ण वाढणार की स्थिती नियंत्रणात येणार?; कोरोनाबाबत सर्वांचे दावे वेगवेगळे

Next

- एस. के. गुप्ता 

नवी दिल्ली : कोरोनाच्या उद्रेकाबाबत सर्वांचे दावे चुकीचे ठरले आहेत. कारण काहीही असले तरी तज्ज्ञांच्या दाव्यांनी सरकार व जनतेची दिशाभूल केली. कोरोना कसा वाढेल, त्याची वाटचाल कशी असेल, याबाबत कोणालाच माहिती नाही. १७ जुलैपर्यंत कोरोना रुग्णांची संख्या १० लाखांच्या पलीकडे जाईल, असे कोणीही म्हटले नव्हते. जुलैमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढेल किंवा त्याचा उच्चांक होईल, असे एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटले होते. त्यांचा दावा खरा ठरताना दिसत आहे.

कोरोना उद्रेकाच्या उच्चांकाबाबत कोण काय म्हणाले?

नॅशनल टास्क फोर्सचे अध्यक्ष व नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल म्हणतात की, देशातील काहीच भागांमध्ये विशेषत: दाट लोकसंख्येच्या भागात स्थिती वाईट आहे. अनेक भाग संक्रमित नाहीत. संपूर्ण देश प्रभावित झाला, असे म्हणता येणार नाही.
डॉ. रणदीप गुलेरिया म्हणतात की, चाचण्या वाढवल्याने रुग्णसंख्येत वाढ होईल. आॅगस्टपर्यंत हा वेग कमीही होईल. कदाचित दुसऱ्या टप्प्याचाही सामना करावा लागू शकतो.

आयसीएमआरच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. निवेदिता गुप्ता म्हणतात की, भारतात अद्याप कोरोनाचा उच्चांक नाही. कोरोना संक्रमण लोकल ट्रान्सफर स्टेजमध्ये आहे.

१) ११ एप्रिल रोजी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी म्हटले होते की, लॉकडाऊन व कंटेन्मेंट केले नाही तर रुग्णांची संख्या १५ एप्रिल रोजी ८ लाख २० हजार झाली असती. देशात केवळ कंटेन्मेंट केले तर १५ एप्रिलपर्यंत १.२० लाख रुग्ण झाले असते. देशात या दिवसापर्यंत ७५२८ रुग्ण होते. ६४३ बरे झाले व २४२ मृत्यू झाले. (दावा चुकीचा)

२) राष्ट्रीय टास्क फोर्स आणि ग्रुप ऑफ इम्पॉवरमेंटचे अध्यक्ष डॉ. व्ही. के. पॉल यांनी २२ मे रोजी म्हटले होते की, देशात ३७ हजार ते ७८ हजार मृत्यू होऊ शकले असते. घराची लक्ष्मण रेषा आम्ही पार केली नाही म्हणून हे टळले. त्यावेळी देशातील रुग्णांची संख्या १,१८,४४७ होती. त्यातील ६६,३३० सक्रिय रुग्ण होते व ४८,५३४ बरे झाले होते. त्यावेळी ३,५८३ मरण पावले होते. तथापि, त्यांना खुलासा द्यावा लागला होता. (दावा चुकीचा)

आयआयटी मुंबई व सिंगापूर विद्यापीठ म्हणते कोरोना संपेल

1 आयआयटी मुंबईने १३ जुलै रोजी अध्ययनात म्हटले आहे की, २ आठवडे ते २.५ महिन्यांत देशातील राज्यांतून कोरोना संपेल. लस आल्याशिवाय हे शक्य नाही.

2 सिंगापूर युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी अँड डिझाईनने २८ एप्रिल रोजी म्हटले होते की, कोरोना जगातून ९ डिसेंबर २०२० पर्यंत जाईल. भारतातून तो २६ जुलैपर्यंत संपेल. हे सध्या तरी अशक्य आहे.

३) ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरच्या मध्यात कोरोनाचा उद्रेक सर्वाधिक असेल, असे आयसीएमआरने १४ जून रोजी म्हटले होते. नंतर म्हटले की, या अभ्यासाशी आमचा संबंध नाही. (दावा चुकीचा)

४) बंगळुरूतील आयआयएससीने १६ जुलै रोजी म्हटले होते की, स्थितीत सुधारणा झाली नाही तर मार्च २०२१ पर्यंत एकूण रुग्णांची संख्या ३७.४ लाखांपर्यंत जाऊ शकते. स्थिती खूपच बिघडली तर ६.१८ कोटी संक्रमित होऊ शकतात.

Web Title: Will the patient grow or will the condition come under control ?; Everyone has different claims about Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.