व्हीआयटी संशोधनाकडे अधिक लक्ष देणार - डॉ. विश्वनाथन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2019 04:42 AM2019-10-03T04:42:36+5:302019-10-03T04:43:56+5:30
आगामी तीन वर्षांत जगातील सर्वोच्च ५०० विद्यापीठांत स्थान मिळविण्याचा निर्धार ‘वेल्लोर इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी’ने (व्हीआयटी) केल्याचे प्रतिपादन या ‘व्हीआयटी’चे कुलपती डॉ. जी. विश्वनाथन यांनी केले.
नवी दिल्ली : आगामी तीन वर्षांत जगातील सर्वोच्च ५०० विद्यापीठांत स्थान मिळविण्याचा निर्धार ‘वेल्लोर इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी’ने (व्हीआयटी) केल्याचे प्रतिपादन या ‘व्हीआयटी’चे कुलपती डॉ. जी. विश्वनाथन यांनी केले. यासाठी व्हीआयटी संशोधनाकडे अधिक लक्ष देणार असल्याचेही विश्वनाथन यांनी सांगितले आहे.
डॉ. विश्वनाथन म्हणाले की, जागतिक विषय मानांकनात व्हीआयटीने आधीच ५५० च्या आतील मानांकन मिळविले आहे. या विषयांत कॉम्युटर सायन्स अँड इन्फॉर्मेशन सिस्टीम्स, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग आणि रसायनशास्त्र यांचा समावेश आहे. वेल्लोरच्या या अभिमत विद्यापीठास सरकारने नुकतेच ‘इन्स्टिट्यूशन आॅफ एमिनन्स’ (आयओई) हा दर्जा दिल्याने व्हीआयटीला राष्ट्रहित व जागतिक गरजांनुसार नवे अभ्यासक्रम व योजना सुरू करता येतील. (वा. प्र.)