मसूद अजहरविषयी चीन भूमिका बदलेल?

By admin | Published: December 31, 2016 02:36 AM2016-12-31T02:36:41+5:302016-12-31T02:36:41+5:30

पाकिस्तानातील दहशतवादी मसूद अजहर व त्याची जैश-ए-मोहम्मद ही संघटना याबाबतची आपली भूमिका येत्या काही दिवसांत चीन स्पष्ट करणार आहे.

Will the role of Masood Azhar change? | मसूद अजहरविषयी चीन भूमिका बदलेल?

मसूद अजहरविषयी चीन भूमिका बदलेल?

Next

नवी दिल्ली : पाकिस्तानातील दहशतवादी मसूद अजहर व त्याची जैश-ए-मोहम्मद ही संघटना याबाबतची आपली भूमिका येत्या काही दिवसांत चीन स्पष्ट करणार आहे. चीन काय निर्णय घेतो, याकडे भारताचे लक्ष आहे. चीनच्या निर्णयानंतर भारत पुढील
पाऊल उचलणार आहे. चीनने आतापर्यंत अजहर मसूदला दहशतवादी म्हणून घोषित करण्यास विरोध केला आहे. तसेच ३१ मार्च रोजीही त्याला दहशतवादी घोषित करण्यापासून रोखत, चीनने आडकाठी केली होती.
मसूद अजहरला संयुक्त राष्ट्र संघ समितीच्या दहशतवाद्यांच्या यादीत टाकण्यात यावे, असा भारताता सातत्याने प्रयत्न आहे. चीनने मात्र विरोध केला होता. चीनच्या या विरोधाच्या भूमिकेबद्दल भारताने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. चीनने केलेला विरोध केवळ तांत्रिक आधारावर व कारणास्तव असून, तो अनाकलनीय आहे, अशी टीका भारताने यापूर्वीही केली आहे.
मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले गेल्यास त्याची सर्व संपत्ती जप्त करणे शक्य होईल आणि त्याला अन्य देशांमध्ये जाताही येणार नाही. त्यांच्या देशांतर्गत कारवायांवरही आपोआप बंधने येतील. मात्र या प्रस्तावाला चीनने व्हेटोचा अधिकार वापररून विरोध केला होता. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीतील पाच सदस्यांना व्हेटो वापरण्याचा अधिकार आहे. त्यात चीनचाही समावेश आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीतील पाच कायम सभासद राष्ट्रांमध्ये अमेरिका, रशिया, चीन, ग्रेट ब्रिटन, फ्रान्स हे देश आहेत.
मात्र चीनने आतापर्यंतची
भूमिका बदलून मसूद अजहरला दहशतवादी म्हणून घोषित
करण्यास संमती दिल्यास वा प्रस्तावाला विरोध न केल्यास मसूद अजहर, त्याची संघटना आणि पाकिस्तान असे सारेच अडचणीत येतील. तो व जैश-ए-मोहम्मदची दहशतवाद्यांच्या यादीत नोंद होईल. नोव्हेंबरमध्ये भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभल यांनी चीनच्या सुरक्षा सल्लागारांशी यासंदर्भात चर्चा केली होती. त्यावेळी चीनने आपण निर्णय बदलणार नसल्याचे स्पष्ट केले होते.
दहशतवादी लढताना दुटप्पी भूमिका घेणे योग्य नाही आणि दहशतवादाचा कोणीच राजकीय फायदा घेता कामा नये, असे चीनने म्हटले आहे. अशा स्थितीत चीनने मसूदबाबतच्या प्रस्तावाला विरोध केला, तर चीन आपल्याच भूमिकेला बगल देत आहे, असे चित्र निर्माण होईल. (लोकमत न्यूज नेटवर्क)

- चीनने पुन्हा विरोध केल्यास काय पावले उचलायची, याची तयारी भारताने करून ठेवली आहे. त्या स्थितीत भारताकडून मसूद अजहरचा भाऊ अब्दुल रौफ असगर तसेच लष्कर-ए-तयब्बा व जैश-ए-मोहम्मदच्या अन्य दहशतवाद्यांवर बंदी घालण्याचा प्रस्ताव मांडला जाऊ शकतो.

- राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेने (एनआयए) मसूद अजहर हाच पठाणकोट दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड असल्याचे स्पष्टपणे म्हटले आहे. त्यामुळे त्याला आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांची यादीत टाकण्यात यावे, असा भारताचा आग्रह आहे.

Web Title: Will the role of Masood Azhar change?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.