यूपी 'सबका साथ सबका विकास'च्या मार्गावर चालणार - योगी आदित्यनाथ

By admin | Published: March 25, 2017 07:45 PM2017-03-25T19:45:05+5:302017-03-25T20:08:09+5:30

उत्तर प्रदेशची मुख्यमंत्रीपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर शनिवारी (25 मार्च) पहिल्यांदाच गोरखपूरला भेट दिली.

UP will run on the path of 'everyone with development' - Yogi Adityanath | यूपी 'सबका साथ सबका विकास'च्या मार्गावर चालणार - योगी आदित्यनाथ

यूपी 'सबका साथ सबका विकास'च्या मार्गावर चालणार - योगी आदित्यनाथ

Next

ऑनलाइन लोकमत

गोरखपूर, दि. 25 - उत्तर प्रदेशची मुख्यमंत्रीपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर शनिवारी (25 मार्च) पहिल्यांदाच आपला मतदारसंघ गोरखपूरला भेट दिली. उत्तर प्रदेशातील सरकार केंद्रातील मोदी सरकारप्रमाणेच  'सबका साथ सबका विकास' च्या मार्गावर चालणार असून येथे जाती किंवा धर्माच्या आधारे भेदभाव केला जाणार नाही, असा मोठा संदेश त्यांनी यावेळी जनतेला दिला आहे.
 
मुख्यमंत्री बनल्यानंतर योगी आदित्यनाथ गोरखपूरमध्ये पहिल्यांदाच येत असल्याने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आलं. यानंतर त्यांनी महाराणा प्रताप कॉलेजमध्ये भाषण केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आभार मानले. 
 
 
अॅन्टी रोमियो स्क्वॉडवरुन उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तर देताना योगी यांनी सांगितले की,  स्थापन केलेल्या पथकाकडून केवळ रोडरोमियोंविरोधात कारवाई होईल, प्रेमी युगुलांविरोधात कोणतीही कारवाई होणार नाही. 
 
'मुख्यमंत्री पद स्वीकारल्यानंतर सर्वाधिक फोन महिला आणि तरुणींचे आले. छेडछाडीला कंटाळून ज्यांनी शाळा-कॉलेजमध्ये जाणं बंद केलं.  आम्ही महिला वर्गाच्या सुरक्षेसाठी निर्धार केला आहे. सार्वजनिक ठिकाणी छेडछाडी घटना घडल्यास स्थानिक प्रशासनातील अधिकारी त्यास जबाबदार असतील', असेही यावेळी त्यांनी स्पष्ट केलं.  
 
यावेळी योगी यांनी आपल्या समर्थकांनाही तंबीही दिली. राज्यातील प्रत्येक नागरिकाला सुरक्षेची हमी देणं आपलं काम आहे. उत्साहाच्या भरात कोणताही अनुचित प्रकार घडू नाही, ही सर्वांची जबाबदारी आहे. दरम्यान, यावेळी त्यांना जनतेला एक खूशखबरही दिली. ज्यांना कैलास मानसरोवरची यात्रा करायची आहे, त्यांना सरकार यात्रेसाठी एक लाख रुपयांचे अनुदान देईल, अशी घोषणा यावेळी योगींनी केली. शिवाय, लखनौ, गाझियाबाद किंवा नोएडामध्ये एका जागेवर कैलास मानसरोवर भवन बांधण्यात येईल, असं आश्वासनही दिलं
 
 

Web Title: UP will run on the path of 'everyone with development' - Yogi Adityanath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.