...तरीही मिळणार ‘आयडीएस’चा लाभ
By Admin | Published: January 18, 2017 01:09 AM2017-01-18T01:09:59+5:302017-01-18T01:09:59+5:30
उत्पन्न प्रकटीकरण योजनेच्या (आयडीएस) नियमात कर विभागाने अल्पशी सुधारणा केली
नवी दिल्ली : उत्पन्न प्रकटीकरण योजनेच्या (आयडीएस) नियमात कर विभागाने अल्पशी सुधारणा केली असून ५ डिसेंबरपर्यंत कर भरला गेला असेल तरी या योजने अंतर्गत जाहीर केलेले बेहिशेबी उत्पन्न वैध धरले जाणार आहे. या आधी करांचा पहिला हप्ता भरण्यची मुदत ३0 नोव्हेंबर ठेवण्यात आली होती.
काळा पैसा बाहेर काढण्यासाठी सरकारने चार महिन्यांची आयडीएस योजना जाहीर केली होती. तिची मुदत ३0 सप्टेंबर २0१६ पर्यंत होती. योजने अंतर्गत देशातील काळा पैसा बाळगणाऱ्यांना ४५ टक्के कर आणि दंड भरून स्वच्छ होण्याची संधी देण्यात आली होती. या योजनेत जाहीर करण्यात आलेल्या काळ््या पैशावरील कराचा पहिला हप्ता ५ डिसेंबर २0१६ पर्यंत भरता गेला असेल तरी तो वैध धरण्यात येणार आहे.
प्राप्तिकर विभागाने देशातील सर्व कर आयुक्तांना यासंबंधीचे निर्देश जारी केले आहेत. सीबीडीटीने म्हटले की, अनेक प्रकरणांत करांचा भरणा धनादेश, आरटीजीएस आणि इलेक्ट्रॉनिक हस्तांतरण यंत्रणेद्वारे करण्यात आला. यात कर भरणा ३0 नोव्हेंबर २0१६ अथवा त्याआधी केला आहे, तरीही प्रत्यक्षात बँकांकडून हे पैसे क्रेडिट व्हायला उशीर झाला. त्यात ३0 नोव्हेंबरनंतर पैसे क्रेडीट झाले. या तांत्रिक चुकीची दुरुस्ती म्हणून ५ डिसेंबर २0१६ पर्यंत क्रेडिट झालेले पैसे ग्राह्य धरले जाणार आहेत. ५ डिसेंबरनंतर क्रेडिट झालेले पैसे मात्र ग्राह्य धरले जाणार नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)