'तबलिगी जमातने जाणूनबुजून पसरवला कोरोना, कारवाई करणारच'- योगी आदित्यनाथ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2020 12:42 PM2020-05-02T12:42:38+5:302020-05-02T13:15:05+5:30
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून कारवाईचा स्पष्ट इशारा
लखनऊ: कोरोना संकटावर भाष्य करताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तबलिगी जमातवर कारवाई करणार असल्याचं स्पष्ट शब्दांत सांगितलं आहे. तबलिगींनी कोरोना लपवला. हा अक्षम्य अपराध आहे. त्यांनी कोरोना लपवला नसता, तर आज कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी असती, असं आदित्यनाथ यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं. तबलिगींविरोधात नक्की कारवाई करणार असल्याचं ते पुढे म्हणाले.
उत्तर प्रदेशातल्या कोरोनाच्या फैलावासाठी योगी आदित्यनाथ यांनी तबलिगींना जबाबदार धरलं आहे. 'तबलिगींनी कोरोना लपवला. त्यांनी कोरोना विविध ठिकाणी पसरवला. त्यांचं हे कृत्य चुकीचं आहे. तबलिगींमुळेच कोरोनाचा वेगानं फैलाव झाला, हे बोलताना मला कोणताही संकोच वाटत नाही. आज राज्यात कोरोनाचे जवळपास १६०० रुग्ण आहेत. यातले १ हजारपेक्षा जास्त तबलिगींशी संबंधित आहेत,' अशी आकडेवारी योगींनी सांगितली.
तबलिगींचं कृत्य अतिशय चुकीचं असल्याचं योगी आदित्यनाथ म्हणाले. 'त्यांनी वेळीच प्रशासनाला माहिती द्यायला हवी होती. मात्र त्यांनी कोरोना लपवला. त्यांच्या विधानांमुळे लोकांमध्ये चुकीची माहिती पसरली. यानंतर बघता बघता अनेकांना कोरोनाची बाधा झाली. त्यांनी जाणूनबुजून केलेलं हे कृत्य अक्षम्य अपराध आहे. उत्तर प्रदेशात ३ हजारपेक्षा जास्त तबलिगींनी विविध ठिकाणी हा अपराध केला. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन क्वारंटाईन केलं. तबलिगींना रुग्णालयात नेण्यात आलं. त्यांनी तिथेही कोरोना पसरवला. त्यांनी प्रशासनाच्या आवाहनाला योग्य वेळी प्रतिसाद दिला असता, तर परिस्थिती बिघडली नसती,' असं आदित्यनाथ यांनी म्हटलं.
'या' व्यक्तींना आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करावंच लागणार
चिंताजनक! अवघ्या २४ तासांत वाढले २२९३ रुग्ण, देशातील कोरोनाबाधितांचा आकडा ३७ हजारांवर
ग्रीन झोनमध्ये दारूची दुकानं उघडणार, केंद्र सरकारची सशर्त परवानगी