वक्फ बोर्डाने बळकावलेली एकेक इंच जमीन परत घेणार; कुंभमेळ्यापूर्वी योगी आदित्यनाथांची मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 18:03 IST2025-01-08T18:03:13+5:302025-01-08T18:03:51+5:30
उत्तर प्रदेशमध्ये महाकुंभमेळ्याच्या तयारीला वेग आला आहे. अशातच या कुंभमेळ्याला मुस्लिम व्यक्तींवर बंदी घालण्यात आली असून यावरून महाकुंभमेळ्याची जमीन ही वक्फ बोर्डाची असल्याचा दावा मौलवींनी केल्याने वादास तोंड फुटले आहे.

वक्फ बोर्डाने बळकावलेली एकेक इंच जमीन परत घेणार; कुंभमेळ्यापूर्वी योगी आदित्यनाथांची मोठी घोषणा
उत्तर प्रदेशमध्ये महाकुंभमेळ्याच्या तयारीला वेग आला आहे. अशातच या कुंभमेळ्याला मुस्लिम व्यक्तींवर बंदी घालण्यात आली असून यावरून महाकुंभमेळ्याची जमीन ही वक्फ बोर्डाची असल्याचा दावा मौलवींनी केल्याने वादास तोंड फुटले आहे. यावर आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोठी घोषणा केली आहे.
वक्फच्या नावावर कब्जा केलेली एकेक इंच जमीन राज्य सरकार काढून घेणार आहे. हे वक्फ बोर्ड आहे की भूमाफिया बोर्ड हेच सांगता येणार नाही, असे योगी आदित्यनाथ म्हणाले. राज्य सरकारने वक्फ बोर्डाच्या नियमांत बदल केला आहे. आता त्यांच्या ताब्यात असलेली जर्व जमीन तपासली जात आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
वक्फ बोर्डाच्या नावावर हडपलेली सर्व जमीन सरकार ताब्यात घेईल आणि त्याचा वापर गरीबांसाठी घरे, शाळा, कॉलेज आणि हॉस्पिटल बांधण्यासाठी केला जाईल, असे ते म्हणाले. सनातन धर्माची प्रतिमा ही आकाशापेक्षा उंच आणि समुद्रापेक्षा खोल आहे. सनातन धर्माची तुलना कोणत्याही संप्रदाय किंवा धर्माशी केली जाऊ शकत नाही, असे त्यांनी सांगितले. तसेच कुंभाची परंपरा वक्फपेक्षा खूप प्राचीन असल्याचे म्हटले आहे.
शंकराचार्यांनीही बाजी पलटवली...
महाकुंभ वक्फच्या जागेवर होत असलेल्या दाव्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी मोठे वक्तव्य केले आहे. जर प्रत्येक मशिदीखाली जर मंदिरे सापडत असतील तर महाकुंभ वक्फच्या जमिनीवर होत असल्याचा दावा जर कोणी करत असेल तर त्यात चुकीचे काय आहे, असा सवाल त्यांनी केला आहे. असा दावा कोणीही करू शकतो. ज्याची जमीन त्याला ती मिळायला हवी, असे शंकराचार्यांनी म्हटले आहे.